pimpri-chinchwad-bjp-corporator-shailaja-more-contractor-threat-electric-crematorium : पिंपरी- चिंचवडमध्ये भाजप नगरसेविकेचे संतप्त वक्तव्य
Pimpri Chinchwad : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहरातील स्मशानभूमींमधील विद्युत दाहिन्या नादुरुस्त असल्याच्या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरताना मोरे यांनी संबंधित ठेकेदारावर संताप व्यक्त केला. दुरुस्तीची कामे झाली नाहीत तर त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळण्याची भाषा त्यांनी सभागृहात केली.
पिंपरी-चिंचवडमधील अनेक स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिन्या नादुरुस्त असल्याचा मुद्दा शैलजा मोरे यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. या समस्येबाबत पालिका आयुक्त आणि संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांना अंत्यसंस्काराच्या वेळी होणाऱ्या अडचणींकडे प्रशासनाचे लक्ष वेधत त्यांनी संबंधित ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली.
Mahayuti Tussle : तटकरेंनी किती ‘सरोगसी बाळांना’ जन्म दिला आणि नंतर…
या मुद्द्यावर बोलताना मोरे यांचा संताप स्पष्टपणे दिसून आला. यापुढे या विषयावर केवळ चर्चा न करता प्रशासनाने संबंधित ठेकेदारांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतरही कामात सुधारणा झाली नाही तर संबंधित ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात आणि त्यानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या कामकाजावर कठोर भूमिका घेणे अपेक्षित असले तरी कायदा हातात घेण्याची भाषा करणे योग्य आहे का, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, या वक्तव्याच्या वेळी विरोधक सभागृहात उपस्थित नव्हते. बुधवारीची सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोधी सदस्यांनी यापूर्वीच सभात्याग केला होता. त्यामुळे मोरे यांच्या वक्तव्यावर सभागृहात विरोधकांकडून तात्काळ प्रतिक्रिया उमटली नाही.
Santosh Pandit arrest :यू-ट्यूबर संतोष पंडितांना अटक मध्यरात्री पोलिसांची कारवाई
या प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवडमधील महापालिका कारभार, ठेकेदारांची जबाबदारी आणि लोकप्रतिनिधींच्या वक्तव्यांची मर्यादा यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, याच काळात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. माटुंगा येथील वेलिंग्टन कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे काही मंत्री उपस्थित होते. संघाकडून क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, क्षेत्र प्रचारक सुमंत आमशेकर यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी सहभागी झाले होते. राज्यातील राजकीय-सामाजिक परिस्थिती, संघ-भाजप समन्वय, एसआयआर आणि युवकांशी संबंधित प्रश्नांसह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.








