व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Raut : ‘हा राजकीय आखाडा, षडयंत्राला आम्ही उत्तर देऊ’

Sanjay Raut : ‘हा राजकीय आखाडा, षडयंत्राला आम्ही उत्तर देऊ’

disha-salian-fir-aditya-thackeray-sanjay-raut-first-reaction : दिशा सालियान एफआयआर मध्ये आदित्य ठाकरेंचं नाव, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Mumbai : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या एफआयआरमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे नाव आल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हे अत्यंत संवेदनशील प्रकरण असून, त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहणे योग्य नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, दिशा सालियान यांच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे. यापूर्वी या प्रकरणावर आपण कधीही भाष्य केलेले नाही. एका तरुणीच्या चारित्र्याचा आणि तिच्या कुटुंबावर कोसळलेल्या मोठ्या आघाताचा हा विषय असल्याने त्याबाबत जबाबदारीने बोलणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा यापूर्वी अनेक वेळा तपास केला असून, त्यांच्या तपासाच्या निष्पक्षतेवर संशय घेण्याचे कारण नाही, असा दावा राऊत यांनी केला.

Suraj Pancholi : दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीचा मोठा खुलासा

महाराष्ट्रात आता शिवसेनेचे सरकार किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसतानाही, फडणवीस सरकारच्या काळात मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून क्लोजर रिपोर्ट सादर केला होता, असेही त्यांनी सांगितले. या तपासात आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले होते, असा दावा राऊत यांनी केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या विविध आरोपांच्या दिशेनेही तपास करण्यात आला. मात्र, त्यातून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कोणताही संबंध किंवा पुरावा आढळला नसल्याचे राऊत यांनी म्हटले.

Manoj Jarange : मनोज जरांगेंचा मुंबई पोलिसांना पुन्हा अर्ज; ५० जणांना आंदोलनाची परवानगी मागितली

सीबीआय चौकशीला न्यायालयाने परवानगी दिली असली तरी तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही आरोपी ठरवता येणार नाही, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले. माध्यमांमध्ये काही जणांकडून सुरू असलेल्या वक्तव्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. “हा आता राजकीय आखाडा झाला आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही,” अशी टीका करत राऊत यांनी या प्रकरणामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला. ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.दरम्यान, या प्रकरणात सीबीआयच्या तपासातून पुढे काय निष्पन्न होते, याकडे आता राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

____

error: Content is protected !!