व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Amit Shah, Sanjay Raut : अमित शहांनी हिंमत असेल तर चेन्नईत बोलून...

Amit Shah, Sanjay Raut : अमित शहांनी हिंमत असेल तर चेन्नईत बोलून दाखवावे, मराठीवरून संजय राऊतांनी दिले आव्हान

Sanjay Raut challenges amit Shah on his Marathi language controversial statement: महाराष्ट्र बहुभाषिय राज्य असल्याचा विधानावरून वाद

Mumbai मुंबईत पार पडलेल्या हिंदी भाषा संमेलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे असे विधान केल्याने नवा राजकीय वाद पेटला आहे. या वक्तव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला आहे. अमित शहा यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी चेन्नईत जाऊन हे वक्तव्य करून दाखवावे, असे उघडे आव्हान देत त्यांनी, १०८ हुतात्म्यांच्या बलिदानातून मराठी भाषिकांचा महाराष्ट्र निर्माण झाला असून शहा हे राज्याची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.

या संमेलनाला उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदी ही मराठी भाषेची मावशी आहे असे विधान केले होते. यावर तीव्र संताप व्यक्त करत, मराठीवर हिंदी थोपवली जात असताना अशी भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, अशी सडकून टीका राऊत यांनी केली. अमित शहा यांच्या या वक्तव्यामुळे आणि राऊतांच्या पलटवारामुळे मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी असा राजकीय सामना रंगला आहे.

Sanjay Raut : ‘हा राजकीय आखाडा, षडयंत्राला आम्ही उत्तर देऊ’

तत्पूर्वी महाराष्ट्रात तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता. मात्र यास उद्धव ठाकरे सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारला माघार घ्यावी लागली होती. हिंदी सक्तीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. अलीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व ऑटोरिक्क्षा चालकांना मराठी बोलण्याची सक्ती केली होती. यासाठी मराठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा शिकण्यासाठी 15ऑगस्टचा अल्टिमेटम देण्यात आला होता. त्यानंतर मराठी भाषा बोलली नाही तर वाहन परवाने रद्द केल्या जाईल असा इशाराही देण्यात आला होता. या निर्णयास मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक वर्षाची स्थगिती दिली आहे. त्यावरही संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. अमित शहा यांच्या दबावा आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीमुळे मुख्यमंत्र्यांनी निर्णय फिरवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

error: Content is protected !!