व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sharad Pawar : शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र, ‘राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर...

Sharad Pawar : शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र, ‘राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा’

Sharad Pawar urges Chief Minister Devendra Fadnavis to provide farmers with assistance of ₹50,000 per acre : शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी

Mumbai महाराष्ट्रात अपुरा व अत्यंत अनियमित पाऊस पडल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील बहुतांश भाग दुष्काळाच्या छायेत असून बळीराजावर मोठे संकट ओढावले आहे, असे सांगत शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची आणि बाधित शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची ठाम मागणी केली आहे.

राज्यातील ओल्या व कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुंबईत एक विशेष बैठक पार पाडली. या बैठकीनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून परिस्थितीच्या गांभीर्याकडे लक्ष वेधले. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे हवामान खात्याने व्यक्त केलेला पावसाच्या तुटीचा अंदाज खरा ठरला असून राज्यात कुठे अतिवृष्टी तर कुठे अत्यंत अपुरा पाऊस पडला आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्यामुळे सोयाबीन आणि कपासाची पिके पूर्णपणे करपून गेली आहेत.

Vijay Wadettiwar : निवडणूक आयोगाला लाज वाटत नाही का? तब्बल २ कोटी मतदारांची नावे वगळल्याने विजय वडेट्टीवार संतापले

या भयानक संकटातून बळीराजाला सावरण्यासाठी सरकारने तातडीने पिकांच्या नुकसानीपोटी एकरी ५० हजार रुपये, तर शेतकरी कुटुंबांना २५ हजार रुपयांची मदत द्यावी, तसेच कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी पवारांनी पत्रात केली आहे. दुसरीकडे, शरद पवारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे स्पष्ट केले आहे. महायुती सरकार कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नसून योग्य ती सर्व मदत तातडीने केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. विरोधकांची आक्रमक मागणी आणि सरकारच्या आश्वासनानंतर आता प्रत्यक्ष मदत बळीराजाच्या हातात कधी पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!