Opposition making draught issue political, devendra Fadnavis alleged: विरोधकांना राजकारणाची वाईट सवयच; मुख्यमंत्र्यांची टीका
Nagpur राज्यात दुष्काळी परिस्थितीवरून टाहो फोडणाऱ्या विरोधकांना प्रत्येक गोष्टीवर राजकारण करण्याची वाईट सवयच लागली आहे. एनडीआरएफचे नियम आणि मदतीचे शासकीय आदेश हे आजचे नसून जुनेच आहेत, हे विरोधकांनाही चांगले ठाऊक आहे. त्यांच्या सत्ताकाळातही याच नियमांनुसार दुष्काळ जाहीर करून मदत दिली जात होती, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळावर सरकारच्या तयारीचा पाढा वाचत विरोधकांवर हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते, याची पूर्वकल्पना सरकारला आधीपासूनच होती. अल निनो’मुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची सूचना हवामान खात्याने आधीच दिली होती. त्यानुसार चारा टंचाई भासू नये म्हणून शासनाने आधीपासूनच चाऱ्याची उपलब्धता आणि आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या होत्या. आता प्राथमिक सर्व्हेचे काम वेगाने सुरू असून, येत्या आठवड्यात आम्ही दुष्काळग्रस्त भागांसाठी मदत जाहीर करणार आहोत.
Chandrashekhar bawankule : येत्या दोनतीन दिवसात दुष्काळावर उपाययोजना; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष सर्व्हेचे आदेश दिले असून पालकमंत्र्यांना परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या बैठकी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. सर्व अधिकारी आढावा घेत आहेत. तातडीने सर्वे रिपोर्ट सादर करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्राची मदत मिळणारच आहे मात्र त्यापूर्वी राज्य शासनाच्यावतीने मदत जाहीर केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यातील पाणीटंचाईवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “सुदैवाने राज्यातील मोठी धरणे यंदा व्यवस्थित भरली आहेत. मात्र, मराठवाड्यातील काही भागांतील छोटी धरणे आणि काही तालुके असे आहेत जिथे अजिबात पाऊस झालेला नाही. अशा गंभीर भागांकडे शासन विशेष लक्ष देणार असून तेथे पाणी आणि चाऱ्याची कोणतीही अडचण भासू दिली जाणार नाही.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दुष्काळी आढावा बैठकीत काजू-बदामाच्या प्लेटा ठेवण्यावरून झालेल्या वादावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांची ढाल बनून प्रशासनाची बाजू सावरली. बैठकीत काजू-बदाम कोणी मुद्दाम ठेवले नसतील. आपल्याकडे शासकीय बैठकांमध्ये पाहुणचाराची एक ठरलेली पद्धत असते, त्यानुसार अधिकाऱ्यांनी ते ठेवले असावेत. या क्षुल्लक गोष्टीचे भांडवल करून राजकीय पोळी भाजण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.








