व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ५०० ट्रक, ४० टोलनाक्यांचे मालक प्यारे खान आरटीओला एवढे ‘प्यारे’ का?

५०० ट्रक, ४० टोलनाक्यांचे मालक प्यारे खान आरटीओला एवढे ‘प्यारे’ का?

विश्व हिंदू परिषदेचा घणाघाती सवाल, दहशतवादी अबू सालेमला भेटल्यावरून वाद चिघळला

Nagpur मुंबई बॉम्बस्फोटातील कुख्यात दहशतवादी अबू सालेम याच्याशी तळोजा कारागृहात घेतलेल्या वादग्रस्त भेटीमुळे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने खान यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांच्या हकालपट्टीसाठी मोठे आंदोलन छेडले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर खान यांच्या पडद्यामागच्या उद्योगांवरून विहिंपने गंभीर आरोप करत थेट आरटीओ आणि पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कोविड काळात ऑक्सिजनचे टँकर मोफत उपलब्ध करून देऊन आणि काळाबाजार रोखण्यात मदत करून प्यारे खान प्रकाशझोतात आले होते. राजकीय वर्तुळात विश्वास त्यांनी संपादन केला. महायुती सरकारने त्यांची अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लावली. या पदाचा राजकीय प्रभाव वापरून अल्पावधीतच त्यांनी तब्बल ४० टोलनाक्यांचे कंत्राट मिळवल्याचा आरोप केला जात आहे.

मुहूर्त मिळेना, जिल्हाप्रमुख ठरेना! शिंदेसेनेची जिल्ह्यातील सूत्रे कुणाच्या हाती?

प्यारे खान यांच्या मालकीच्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक व तस्करी केली जात असल्याचा सनसनाटी आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. खान यांच्याकडे संवैधानिक पद आणि बड्या नेत्यांचा वरदहस्त असल्याने आरटीओ आणि पोलिस प्रशासन त्यांच्या गाड्यांची अजिबात तपासणी करत नाही. ५०० ट्रक आणि ४० टोलनाक्यांचे मालक असलेल्या प्यारे खान यांच्यावर कारवाई करायला आरटीओ एवढे का घाबरते असा सवाल विहिंपच्या नेत्यांनी केला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील सस्पेन्स कायम

सोमवारी प्यारे खान यांच्याविरोधात विहिंप व बजरंग दलाने पुकारलेल्या आंदोलनात भाजपच्या काही आजीमाजी नगरसेवकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महायुती सरकारनेच दिलेले संवैधानिक पद उपभोगताना दहशतवाद्याशी संधान साधणे आणि गोवंश तस्करीत नाव येणे, यामुळे आता भाजपमधील एका गटालाही प्यारे खान अप्रिय झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी आता प्यारे खान यांच्या उचलबांगडीसाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

 

error: Content is protected !!