व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण तुम्ही परस्पर आंदोलन केले तर चालते का? उद्धव ठाकरेंनी आता इगो बाजूला...

तुम्ही परस्पर आंदोलन केले तर चालते का? उद्धव ठाकरेंनी आता इगो बाजूला ठेवावा

नाना पटोलेंचा सल्ला; ४ ऑक्टोबरच्या जनमोर्चात काँग्रेसच्या सहभागावर मोठं वक्तव्य

Nagpur केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी येत्या ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त जनमोर्चा काढण्याची घोषणा केली असून, या आंदोलनात महाविकास आघाडीसह सर्व विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

मात्र, त्यापूर्वीच काँग्रेसने जिल्हा पातळीवर या मुद्द्यावर स्वतंत्र आंदोलने सुरू केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असहमती दर्शवत ठाकरे बंधूंनी इगो बाजूला ठेवावा, असा सल्ला दिला आहे.

मुळात हे आंदोलन कुठल्या एका पक्षाचे वा व्यक्तीचे नसून लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीची ही देशातील मोठी लढाई आहे, त्यामुळे कोणी आधी आंदोलन केले अन् कोणी नंतर याला इथे महत्त्व नाही, असे सांगत पटोलेंनी काँग्रेस सुरुवातीपासूनच या विरोधात रस्त्यावर उतरली असल्याचे स्पष्ट केले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार बावनकुळे

अनेकदा शिवसेनेनेही न विचारता परस्पर आंदोलने केली असली तरी आम्ही कधी आक्षेप घेतला नाही वा नाराजी व्यक्त केली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. ४ ऑक्टोबरच्या जनमोर्चात काँग्रेस सहभागी होणार की नाही, यावर बोलताना या आंदोलनाला तत्त्वत: पाठिंबा असून सहभागाबाबतचा अंतिम निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल असे पटोलेंनी स्पष्ट केले, ज्यामुळे या आंदोलनातील काँग्रेसच्या भूमिकेबाबत अजूनही सस्पेंस कायम असून महाविकास आघाडीत नेतृत्वावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शॉर्ट सर्किट सुरू असताना कक्षसेवक वऱ्हांड्यात झोपले होते, माजी पालकमंत्र्यांचा दावा

तत्पूर्वी राहुल गांधी यांनी बोलावलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे प्रत्यक्ष सहभागी झाले नाहीत. त्यांनी ऑनलाईन बैठकीला उपस्थिती लागवली. या बैठकीतुसुद्धा सर्वच पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन झेडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आंदोलनाच्या नेतृत्वावरून इंडिया आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या नाराजीने मतभेद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

error: Content is protected !!