व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण भाजपचा नागपूरसह पुण्यावरही दावा; शिवसेना-राष्ट्रवादी अस्वस्थ

भाजपचा नागपूरसह पुण्यावरही दावा; शिवसेना-राष्ट्रवादी अस्वस्थ

विधानपरिषदेसाठी महायुतीचा ‘३-१-१’ फॉर्म्युला निश्चित; पुण्यावरून तिढा

Nagpur विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून महायुतीमध्ये जागावाटपाचा ‘३-१-१’ हा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. या फॉर्म्युलानुसार भाजप तीन, शिंदे गटाची शिवसेना एक आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एक जागा लढवणार आहे. मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघावर तिन्ही पक्षांनी दावा ठोकल्यामुळे महायुतीतील तिढा वाढला आहे.

महायुतीच्या ठरलेल्या सूत्रानुसार भाजपने नागपूर पदवीधर, पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक हे तीन मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याचे ठरवले आहे. तसेच अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला आणि छत्रपती संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, शिवसेनेने याला विरोध दर्शवत पुणे शिक्षक मतदारसंघाची मागणी केली आहे. दुसरीकडे, पुणे हे आपले मुख्यालय असल्याचा युक्तिवाद करत राष्ट्रवादीनेही पुण्यातील किमान एक मतदारसंघ आपल्याला मिळावा असा आग्रह धरला आहे.

तुम्ही परस्पर आंदोलन केले तर चालते का? उद्धव ठाकरेंनी आता इगो बाजूला ठेवावा

गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी भाजपचा पराभव केल्यामुळे नागपूरचा हा पारंपरिक बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असून त्यांनी नोंदणी प्रमुख म्हणून सुमारे पावणेदोन लाख मतदारांची नोंदणी केल्याचा दावा केला आहे. मात्र, दुसरीकडे माजी आमदार अनिल सोले यांनीही पुन्हा तयारी सुरू केली आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार बावनकुळे

त्यांना नागपुरातील भाजपच्या अनेक आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या अनिल सोले यांच्या वाढदिवसाच्या भव्य कार्यक्रमाला भाजपच्या एका विद्यमान आमदाराने आर्थिक रसद पुरवली होती. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते, मात्र नागपुरात असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणे टाळले. या घडामोडींमुळे सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारीवरून नागपूर भाजपमध्ये दोन तट पडल्याचे स्पष्ट दिसत आहे.

error: Content is protected !!