व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अनिल सोले आमचे नेते आहेत… बावनकुळेंची सावरासावर

अनिल सोले आमचे नेते आहेत… बावनकुळेंची सावरासावर

नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपमधील बंडाने वाढवले नेत्यांचे टेन्शन

Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमधील असंतोषाचा वणवा अधिकच पेटला आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्याविरोधात माजी आमदार अनिल सोले यांनी दंड थोपटल्याने भाजपचे टेन्शन शिगेला पोहोचले आहे. या वाढत्या बंडखोरीवर महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ‘सोले आमचे नेते आहेत’ असे सांगत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला.

पक्षाने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता वाद संपले आहेत. अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी ते आमचे नेते आहेत. त्यांची समजूत काढली जाईल. ते नक्कीच आम्हाला सहकार्य करीतल अशी आशा बावनकुळे यांनी व्यक्त केली.

तत्पूर्वी, विधान परिषद मतदारसंघांमधील बंडखोरीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप केला होता. पक्षात काही नाराजी असेल तर ती नक्की दूर करू. बंडखोरांशी मी स्वतः चर्चा करणार असून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, असे जाहीर आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

बंडखोरांनो माघारी फिरा, चर्चा करू; मुख्यमंत्र्यांचे थेट आवाहन

नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा अभेद्य गड मानला जात होता. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांचे वडील कै. गंगाधरराव फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी आणि नाराजीमुळे भाजपला हा हक्काचा बालेकिल्ला गमवावा लागला होता. तीच ऐतिहासिक चूक पुन्हा घडल्यास मोठा राजकीय फटका बसेल, हे ओळखूनच मुख्यमंत्र्यांसह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना मध्यस्थीसाठी मैदानात उतरावे लागले आहे.

मुनगंटीवार म्हणजे भाजपाचे खरे निष्ठावंत

दक्षिण नागपूरचे माजी आमदार, शहराध्यक्ष, एनआयटीचे विश्वस्त, ग्रामीण भाजप अध्यक्ष आणि अलीकडेच पश्चिम नागपुरातून निवडणूक लढवलेले सुधाकर कोहळे यांनाच पुन्हा संधी दिल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांत तीव्र असंतोष आहे. प्रत्येक महत्त्वाच्या जागेवर कोहळेच का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

error: Content is protected !!