पाणीटंचाईच्या काळात जलतरण तलावात टँकरद्वारे पाणी भरण्याची चौकशी करा; पोलीस, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांकडे तक्रार
Akola अकोला शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना तब्बल ११ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत आहे. अनेक भागांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत अकोला महानगरपालिकेच्या नवीन जलतरण तलावात उद्घाटनाच्या निमित्ताने टँकरद्वारे पाणी भरले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक निलेश रामकृष्ण देव यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकारी आणि अकोला महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे संयुक्त तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
अकोला शहरात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सांस्कृतिक भवन आणि जलतरण तलावाची सुविधा उपलब्ध होत आहे. या विकासकामांचे आपण स्वागत करतो. मात्र, एकीकडे शहरातील नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे जलतरण तलावासाठी टँकरने पाणी भरले जात असेल, तर हा प्रकार प्रशासनाने स्पष्ट करण्याची गरज आहे, असे देव यांनी म्हटले आहे.
पाणी नेमके कुठून आणले? प्रशासनाला सवाल
जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बांधकामासाठी एसटीपी प्रक्रियेद्वारे शुद्ध केलेले पाणी वापरण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नवीन बोअरवेल खोदण्यावर निर्बंध घालण्यासह पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी उपाययोजना लागू केल्या आहेत. मग जलतरण तलावासाठी पाणी कोणत्या स्रोतामधून आणण्यात आले? त्यासाठी किती टँकर वापरण्यात आले? पाणी भरण्याची परवानगी कोणी दिली? असे प्रश्न देव यांनी उपस्थित केले आहेत. या सर्व बाबींची सविस्तर माहिती प्रशासनाने जनतेसमोर मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कायदेशीर कारवाईची मागणी
देव यांनी तक्रारीत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय न्याय संहिता २०२३ आणि महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील लागू तरतुदींच्या अनुषंगाने चौकशी करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जलतरण तलावासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याचा स्रोत, टँकरची संख्या, त्यासाठी झालेला खर्च आणि पाणी भरण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती सार्वजनिक करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील पाणीटंचाई कायम असेपर्यंत जलतरण तलावात अतिरिक्त पाणी भरणे आणि त्याचा नियमित वापर सुरू ठेवण्याबाबत प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी अहवाल लेखी स्वरूपात द्यावा, अशी मागणी देव यांनी केली आहे.अकोलेकरांना ११ दिवसांनी पाणी, मग जलतरण तलावासाठी टँकरने पाणी कशासाठी?
पाणीटंचाईच्या काळात जलतरण तलावात टँकरद्वारे पाणी भरण्याची चौकशी करा; निलेश देव यांची पोलीस, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांकडे तक्रार
अकोला : अकोला शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना तब्बल ११ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत आहे. अनेक भागांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत अकोला महानगरपालिकेच्या नवीन जलतरण तलावात उद्घाटनाच्या निमित्ताने टँकरद्वारे पाणी भरले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक निलेश रामकृष्ण देव यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकारी आणि अकोला महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे संयुक्त तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
अकोला शहरात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सांस्कृतिक भवन आणि जलतरण तलावाची सुविधा उपलब्ध होत आहे. या विकासकामांचे आपण स्वागत करतो. मात्र, एकीकडे शहरातील नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे जलतरण तलावासाठी टँकरने पाणी भरले जात असेल, तर हा प्रकार प्रशासनाने स्पष्ट करण्याची गरज आहे, असे देव यांनी म्हटले आहे.
पाणी नेमके कुठून आणले? प्रशासनाला सवाल
जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बांधकामासाठी एसटीपी प्रक्रियेद्वारे शुद्ध केलेले पाणी वापरण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नवीन बोअरवेल खोदण्यावर निर्बंध घालण्यासह पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी उपाययोजना लागू केल्या आहेत. मग जलतरण तलावासाठी पाणी कोणत्या स्रोतामधून आणण्यात आले? त्यासाठी किती टँकर वापरण्यात आले? पाणी भरण्याची परवानगी कोणी दिली? असे प्रश्न देव यांनी उपस्थित केले आहेत. या सर्व बाबींची सविस्तर माहिती प्रशासनाने जनतेसमोर मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कायदेशीर कारवाईची मागणी
देव यांनी तक्रारीत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय न्याय संहिता २०२३ आणि महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील लागू तरतुदींच्या अनुषंगाने चौकशी करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जलतरण तलावासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याचा स्रोत, टँकरची संख्या, त्यासाठी झालेला खर्च आणि पाणी भरण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती सार्वजनिक करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील पाणीटंचाई कायम असेपर्यंत जलतरण तलावात अतिरिक्त पाणी भरणे आणि त्याचा नियमित वापर सुरू ठेवण्याबाबत प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी अहवाल लेखी स्वरूपात द्यावा, अशी मागणी देव यांनी केली आहे.








