व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण पाणी कपात करायचीच होती तर ३८ हजार कोटींचा ‘उपसा’ कशाला?

पाणी कपात करायचीच होती तर ३८ हजार कोटींचा ‘उपसा’ कशाला?

जलसंधारणाच्या पैशांवरून वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

Nagpur सध्याची दुष्काळी परिस्थिती करोनापेक्षाही भयंकर असून दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या वल्गना करणाऱ्या सरकारने जलसंधारणावर खर्च केलेले ३८ हजार कोटी रुपये नेमके कुठे गेले, असा घणाघाती सवाल करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

जलसंधारणाच्या ३८ हजार कोटींच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी करत, ‘अल निनो’मुळे पाऊस हुलकावणी देणार आणि तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार याची आधीपासून कल्पना असूनही सरकारने पाणी, चारा व शेतीबाबत कोणतीही पूर्वतयारी केली नाही, अशी टीका त्यांनी केली. तहान लागल्यावर विहीर खणणाऱ्या या सरकारच्या निष्काळजीपणामुळेच १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपातीची वेळ आली असून जनतेच्या हालअपेष्टांना सरकारच पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. दुष्काळाच्या मुद्द्यासोबतच वडेट्टीवार यांनी इंडिया आघाडीच्या खासदारांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.

जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे !

एसआयआर आणि फॉर्म ६ मधील बदलांना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली नसताना हे बदल कोणाच्या अधिकारात करण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा बेकायदेशीर बदलांमुळे ज्ञानेश कुमार यांना निवडणूक आयुक्तपदी राहण्याचा एक मिनिटही अधिकार उरलेला नसून मोदी सरकारने त्यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केली.

error: Content is protected !!