व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण सरकारमध्ये असलेले बच्चू कडू मायक्रो फायनान्स कंपन्यांची कार्यालये फोडणार

सरकारमध्ये असलेले बच्चू कडू मायक्रो फायनान्स कंपन्यांची कार्यालये फोडणार

कर्जवसुलीसाठी दमदाटी करणाऱ्या कंपन्यांना इशारा, महिलांची बदनामी केल्यास गय नाही

Amravati दुष्काळाच्या झळांनी शेतकरी आणि ग्रामस्थ आर्थिक संकटात सापडले असताना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या कर्जवसुलीच्या सक्तीच्या तगाद्यामुळे त्यांच्या अडचणींत भर पडत आहे. कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी काही कंपन्यांचे कर्मचारी दमदाटी करीत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या प्रकारांमुळे त्रस्त झालेल्या कर्जदारांच्या बाजूने शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्जवसुलीच्या नावाखाली दमदाटी केल्यास आणि कर्जदार महिलांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित कंपन्यांची कार्यालये फोडू, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

दुष्काळग्रस्त भागातील अनेक शेतकरी आणि ग्रामस्थ आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. शेतीचे नुकसान, उत्पन्नातील घट आणि वाढता आर्थिक ताण यामुळे कर्जाचे हप्ते भरणे अनेकांना कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून हप्त्यांसाठी वारंवार तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांनी महिलांचे फोटो काढून ते वरिष्ठांना पुरावा म्हणून पाठवल्याचे प्रकारही समोर आल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे नाराज झाले तर सरकार बदलेल; बच्चू कडूंचे सूचक विधान

कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदारांना त्रास देणे, त्यांच्यावर दबाव आणणे किंवा महिलांची प्रतिष्ठा दुखावणारे प्रकार करणे खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. अशा प्रकारांना आळा न घातल्यास संबंधित कंपन्यांच्या कार्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

‘कार्यालये फोडण्याचे काम चोख करू’

कर्जवसुलीच्या नावाखाली सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करीत बच्चू कडू यांनी कंपन्यांना थेट आव्हान दिले आहे. कर्जदारांना किंवा महिलांना त्रास देण्याचा आणि त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्यास कंपन्यांची कार्यालये फोडण्याचे काम आपण ‘चोख’ करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमरावतीच्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोरांमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली

कडू यांच्या या आक्रमक विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या कर्जदारांना दिलासा मिळावा आणि वसुलीच्या प्रक्रियेत त्यांच्याशी सन्मानाने वागले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, बच्चू कडू यांच्या इशाऱ्यानंतर मायक्रो फायनान्स कंपन्या वसुलीची पद्धत बदलणार का आणि संबंधित तक्रारींची दखल घेतली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!