व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण २६ उमेदवार रिंगणात, दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फुटणार

२६ उमेदवार रिंगणात, दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फुटणार

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंगात

Amravati अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याने दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फुटणार आहेत. या निवडणुकीत २६ उमेदवार रिंगणात असून, शिक्षक मतदारांचा कौल कोणाला मिळणार, याकडे संपूर्ण विभागाचे लक्ष लागले आहे.

अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील एकूण ३५ हजार ८१० मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी महायुती, महाविकास आघाडीसह विविध संघटना आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचारात जोर लावला आहे. प्रचारसभा, वैयक्तिक भेटीगाठी आणि पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला असून, अखेरच्या टप्प्यात मतांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे.

मतदानाला अवघे काही दिवस उरल्याने प्रचाराचा जोर वाढला आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानातून कोणाच्या पारड्यात किती मते पडतात, यावर विजयाचे गणित अवलंबून असेल. त्यामुळे दिवाळीपूर्वी कोणाच्या अंगणात विजयाचा गुलाल उधळला जाणार आणि कोणाच्या वाट्याला पराभवाची निराशा येणार, याचे उत्तर २७ ऑक्टोबरला मिळणार आहे.

बुलढाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फोडला भोपळा

दिग्गजांसह बंडखोरांची प्रतिष्ठा पणाला!

या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किरण सरनाईक, तर महाविकास आघाडीकडून अदिती पोहरे यांच्यात प्रमुख लढत मानली जात आहे. मात्र, विविध शिक्षक संघटनांचे उमेदवार आणि बंडखोरांनीही निवडणुकीत रंगत आणली आहे.

विमाशी व नुटा समर्थित दिलीप कडू, भाजपच्या बंडखोर शिक्षण परिषदेच्या संगीता शिंदे-बोंडे आणि चंद्रशेखर भोयर, सुमित पवार, शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर तथा शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दत्तात्रय लहाने, शिक्षक भारतीचे सुरेश देवकरे, नुटा समर्थित प्रा. प्रशांत विघे आणि अविनाश बोर्डे यांच्यासह अन्य अपक्ष उमेदवारांनीही प्रचारात जोर लावला आहे.

मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंवर ‘५०० कोटी’चा बॉम्ब

बंडखोर उमेदवारांमुळे प्रमुख पक्षांच्या मतविभाजनाची शक्यता असून, शिक्षक संघटनांची ताकद आणि वैयक्तिक संपर्क यांचीही कसोटी लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ दोन प्रमुख उमेदवारांपुरती मर्यादित राहिलेली नाही. अखेरच्या टप्प्यातील मतांची जुळवाजुळव आणि मतदानाचा टक्का विजयाचे गणित बदलू शकतो.

निवडणुकीचे वेळापत्रक

मतदान : २३ ऑक्टोबर

मतमोजणी व निकाल : २७ ऑक्टोबर

एकूण मतदार : ३५ हजार ८१०

रिंगणातील उमेदवार : २६

error: Content is protected !!