व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या काँग्रेसच्या काळात ‘यशोमती’चे प्रेम, भाजपच्या काळात ‘पुतना मावशी’चे!

काँग्रेसच्या काळात ‘यशोमती’चे प्रेम, भाजपच्या काळात ‘पुतना मावशी’चे!

सात योजनांपैकी चार बंद, तीन योजना पुढील वर्षापासून बंद होणार; डॉ. सुधीर ढोणे यांचा आरोप

Amravati राज्यातील अनाथ, निराधार बालके आणि विधवा महिलांसाठी तत्कालीन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सुरू केलेल्या सात कल्याणकारी योजना भाजप महायुती सरकारने बंद केल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे. महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करून सत्तेत आलेल्या महायुती सरकारने निराधार महिला आणि त्यांच्या मुलांसाठीच्या योजनांना मात्र टाळे लावले. राज्यातील बालकांसाठी काँग्रेसच्या काळात ‘यशोमती’चे प्रेम, तर भाजपच्या काळात ‘पुतना मावशी’चे प्रेम दिसत असल्याची टीका डॉ. ढोणे यांनी केली.

पौराणिक कथेत गोकुळातील यशोदेने श्रीकृष्णाला स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेमाने वाढविले. त्याचप्रमाणे यशोमती ठाकूर यांनीही राज्यातील अनाथ आणि निराधार बालकांसाठी मातृत्वाच्या भावनेतून विविध योजना सुरू केल्या होत्या. मात्र, या योजनांना बंद करून महायुती सरकारने बालकांप्रती असलेली आपली भूमिका स्पष्ट केली आहे, असा आरोप डॉ. ढोणे यांनी केला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जरांगे यांनी रितसर तक्रार करावी, आम्ही चौकशीस तयार

 

कोरोनाकाळात घेतले होते महत्त्वाचे निर्णय

कोरोना महामारीत आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय यशोमती ठाकूर यांनी घेतला होता. राज्यातील अशा ४२ बालकांना या मदतीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, कोरोनामुळे एका पालकाला गमावलेल्या १,३९७ बालकांना दरमहा अडीच हजार रुपये देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

शून्य ते १८ वर्षे वयोगटातील अनाथ, निराधार, बेघर आणि संकटग्रस्त बालकांच्या संगोपनासाठी असलेल्या बालसंगोपन योजनेतील मदत प्रतिमाह ४२५ रुपयांवरून १,१०० रुपये करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. कोरोनामुळे पती गमावलेल्या ५५७ महिलांसाठी ‘वात्सल्य’ उपक्रम सुरू करण्यात आला होता. या माध्यमातून निराधार महिला आणि त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी विविध शासकीय योजनांची सांगड घालण्यात आली होती. महिलांना संजय गांधी निराधार योजनेसह अन्य योजनांचा लाभ देणे, तसेच रोजगार आणि उपजीविकेसाठी मदत उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

सावकारीच्या विळख्यात ग्रामीण महाराष्ट्राची चिंता वाढली!

चार योजना बंद, तीन योजनांनाही टाळे

डॉ. ढोणे यांच्या म्हणण्यानुसार, महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या चार योजना १६ ऑक्टोबर २०२६ पासून बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलांसाठीची बहुउद्देशीय सामाजिक केंद्रे, जिल्हा परिषदांमार्फत महिला मंडळांना अनुदान, देवदासींच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा परिषदांना सहाय्य आणि वीज नसलेल्या अंगणवाड्यांसाठी सौरऊर्जा संच उपलब्ध करून देण्याच्या योजनांचा समावेश आहे.

याशिवाय, ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची सुधारित आवृत्ती, निवारागृहे चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना आर्थिक सहाय्य आणि कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदत देणाऱ्या या तीन योजनाही पुढील वर्षापासून बंद करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतल्याचा दावा डॉ. ढोणे यांनी केला आहे.

‘देश वाचवा, संविधान वाचवा’; मतदार यादीतील कथित अनियमिततेविरोधात काँग्रेस आक्रमक

‘पुतना मावशी’च्या प्रेमाचा आरोप

पौराणिक कथेनुसार, कंसाने श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी पुतना राक्षसीला पाठविले होते. तिने आईचे रूप धारण करून कृष्णाला विषारी दूध पाजण्याचा प्रयत्न केला होता. बाहेरून प्रेमाचा आव आणणाऱ्या, पण मनात घाताची भावना ठेवणाऱ्या पुतनेच्या कथेचा संदर्भ देत डॉ. ढोणे यांनी महायुती सरकारवर टीका केली. योजनांच्या बंद करण्याच्या निर्णयातून राज्यातील बालकांप्रती सरकारची भूमिका दिसून येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

error: Content is protected !!