व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी लाचार! अमित शहांच्या भेटीवरून विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर घणाघात

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी लाचार! अमित शहांच्या भेटीवरून विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर घणाघात

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीत झाली होती भेट

Nagpur अजितदादा पवारांच्या अपघाती निधनानंतर हातातून गेलेले महत्त्वाचे अर्थखाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची धडपड सुरू असून, याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे.

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अक्षरशः लाचार झाली आहे, असा घणाघाती टोला त्यांनी लगावला.
अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभवाची कमतरता असल्याचे कारण पुढे करत भाजपने अर्थखाते स्वतःकडेच ठेवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. योग्य वेळी अर्थखाते राष्ट्रवादीला परत केले जाईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. परंतु, आता भाजप या मागणीकडे साफ दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रवादीच्या गोटात तीव्र अस्वस्थता पसरली आहे.

अमरावती जिल्हा बँकेचे संचालक न्यायालयात जाणार!

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकतीच अर्थखाते परत देण्याची जाहीर मागणी केली होती. मात्र, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती मागणी टोलवून लावली.

अमरावती शिक्षक मतदारसंघात २० उमेदवारांची अनामत जप्त

भाजप दाद देत नाही आणि योग्य वेळ येतच नसल्याचे पाहून अखेर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, या दिल्लीवारीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार अनुपस्थित होते. पदवीधर मतदारसंघाच्या जागावाटपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी, पुण्यातील पराभवानंतर भाजप-शिवसेनेतील शाब्दिक युद्ध आणि आता अर्थखात्यावरून राष्ट्रवादीची कोंडी—या सर्व घडामोडींवरून महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. नेत्यांची दिल्लीवारी आणि भाजपची टोलवाटोलवी बघून विजय वडेट्टीवार यांनी अचूक टायमिंग साधत महायुतीच्या युतीधर्मावर आणि राष्ट्रवादीच्या लाचारीवर बोट ठेवले आहे. आगामी काळात महायुतीतील हा वाद अधिक चिघळण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

error: Content is protected !!