व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत, बळीराजाचा अश्रू पुसण्यासाठी थेट बांधावर जाणार

मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत, बळीराजाचा अश्रू पुसण्यासाठी थेट बांधावर जाणार

नागपूर जिल्ह्यातील एका गावात शेतकऱ्यांसोबत दिवस घालवणार

Nagpur राज्यात ओढवलेले भीषण दुष्काळाचे संकट आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी महायुती सरकार धावून आले आहे. शेतकरी नैराश्यात जाऊ नये आणि त्याची दिवाळी काळी जाऊ नये, यासाठी मी स्वतः नागपूर जिल्ह्यातील एका गावात शेतकऱ्यांसोबत एक दिवस दिवाळी साजरी करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींनाही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवाळी साजरी करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

दुष्काळाच्या या कठीण काळात बळीराजाला तातडीचा दिलासा म्हणून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पाच हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. दुःखाचा डोंगर मोठा आहे, आम्ही शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. या वर्षी सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस पडल्याने पिके करपून गेली आहेत. येत्या आठ महिन्यांत भीषण पाणी आणि चारा टंचाईचा सामना करावा लागणार आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ येऊ नये, म्हणून सरकारतर्फे युद्धपातळीवर चाऱ्याची व्यवस्था केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

इंडिया आघाडीचे षड्यंत्र; भाजप पदयात्रेतून चोख उत्तर देणार, बावनकुळेंचा थेट घणाघात

या महासंकटाचा सामना करण्यासाठी दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सनदी अधिकारी, आमदार आणि कर्मचाऱ्यांनी १ दिवसाचे वेतन दिले आहे. तर ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आपल्या मुलाचा विवाह अत्यंत साधेपणाने उरकून १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.

 

error: Content is protected !!