व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण विदर्भाचा ‘कॅलिफोर्निया’ संकटात; महायुती फक्त घोषणाबाजीमध्ये खुश

विदर्भाचा ‘कॅलिफोर्निया’ संकटात; महायुती फक्त घोषणाबाजीमध्ये खुश

 

सरकारला घेरणार शरद पवारांची राष्ट्रवादी, संत्रा उत्पादक अडचणीत

Nagpur दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईमुळे ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटोल, नरखेड, अमरावती आणि मोर्शी परिसरातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अनेक वर्षांपासून जोपासलेल्या फळबागा पाण्याअभावी सुकत असताना महायुती सरकार केवळ घोषणाबाजी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते सलील देशमुख यांनी केला आहे. शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची तुटपुंजी मदत नको, तर हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी पक्षाच्या वतीने आक्रमक धोऱण आखल्या जात आहे.

पावसाळ्यात पडलेला खंड आणि अनियमित पावसामुळे जमिनीतील भूजल पातळी झपाट्याने खालावली आहे. प्रखर उन्हामुळे आणि पाण्याअभावी संत्रा-मोसंबीच्या बागा वाळू लागल्या असून, यापूर्वीच सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला असला, तरी मदतीचे धनादेश अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. दिवाळीपूर्वी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदतही लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसून, कर्जमाफीचे पैसे आणि पूर्व विदर्भातील धान उत्पादकांचा बोनसही अद्याप प्रलंबित असल्याचा दावा सलील देशमुख यांनी केला आहे.

भाजप-ठाकरे गटात पत्रकयुद्ध; नितीन देशमुखांच्या टीकेने भाजप नेते अस्वस्थ?

सरकार केवळ घोषणा आणि आकडेवारी जाहीर करून वेळकाढूपणा करत असल्याची टीका देशमुख यांनी केली. “केवळ घोषणांनी शेतकरी वाचणार नाही, त्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आणि शेतमजुरांना हेक्टरी २५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. या आंदोलनाची नेमकी रूपरेषा अद्याप निश्चित झाली नसली, तरी आगामी हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावरून सरकारला घेरून शेतकऱ्यांना मदत देण्यास भाग पाडू, असा इशाराही सलील देशमुख यांनी दिला आहे

 

error: Content is protected !!