व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण गद्दार सेनेला फक्त फोडाफोडी आणि फाडाफाडी आवडते

गद्दार सेनेला फक्त फोडाफोडी आणि फाडाफाडी आवडते

काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल, सोनिया गांधींचे पुस्तक फाडून बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन

Mumbai : काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या प्रती फाडल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, काँग्रेसने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. पुस्तक फाडून शिंदे गटाने बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले असून, ही कृती सूर्यावर थुंकण्यासारखी आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तर, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकाराचा निषेध करत पुस्तकाच्या प्रती फाडणे ही निर्लज्ज मस्ती आहे, अशी टीका केली आहे.

सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रातील एका टिप्पणीच्या निषेधार्थ शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करत पुस्तकाच्या प्रती फाडण्यात आल्या होत्या. या घटनेवर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पुस्तक फाडल्याने इतिहास बदलत नाही किंवा सोनिया गांधी यांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व कमी होत नाही. हे पुस्तक इंग्रजीत असल्याने एकनाथ शिंदे यांना ते वाचता येत नसावे, म्हणूनच त्यांनी वाचून चर्चा करण्याऐवजी ते फाडण्याचा मार्ग निवडला. त्यांच्यात खरंच हिम्मत असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेले जे निर्णय रद्द केले आहेत,

 

उद्धव ठाकरे मौन सोडा, स्वा. सावरकरांच्या अपमानावर भूमिका स्पष्ट करा

त्याचे शासन निर्णय फाडून दाखवावेत. एका महिलेचे पुस्तक महिलांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून फाडणे हा केविलवाणा प्रकार असून हा मातृत्वाचाही अपमान असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. गांधी कुटुंबाने देशासाठी दिलेले बलिदान आणि त्याग मोठा असून, शिंदे गटाच्या या कृतीला ‘गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारणार नाही’ या भूमिकेतून त्यांच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करून चोख उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या मुद्द्यावरून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. “सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील पान क्रमांक २०१ फाडून ज्यांनी निषेध नोंदवला, त्यांनी आपल्या वैचारिक दिवाळखोरीचे दर्शन घडवले आहे. ज्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचे आणि लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे, तिथे पुस्तकाच्या प्रती फाडणे म्हणजे निर्बुद्धांची मांदियाळी आहे. पुस्तकातील वस्तुस्थिती मान्य नसेल, तर लोकशाही मार्गाने विरोध करा किंवा त्याविरोधात पुस्तक लिहा. पण पुस्तके फाडण्याची ही नशा उतरायला वेळ लागणार नाही,” असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.

 

error: Content is protected !!