व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण उद्धव ठाकरे मौन सोडा, स्वा. सावरकरांच्या अपमानावर भूमिका स्पष्ट करा

उद्धव ठाकरे मौन सोडा, स्वा. सावरकरांच्या अपमानावर भूमिका स्पष्ट करा

चंद्रशेखर बावनकुळे यांचे खुले आव्हान, ठाकरे सेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न

Nagpur शिंदे सेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, या मुद्द्यावरून ठाकरे गटाने राज्यभर आंदोलन छेडले आहे.

या पार्श्वभूमीवर, भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्यात आला आहे, त्यावर उद्धव ठाकरे काहीच का बोलत नाहीत त्यांनी सावरकरांवरील मौन सोडावे आणि आपली भूमिका स्पष्ट करावी, असे थेट आवाहन बावनकुळे त्यांनी कोंडी केली आहे.

सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीच्या निषेधार्थ शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.

इवली-गडचिरोली महामार्गासाठी ४५.७९ कोटींचा निधी मंजूर

 

 

 

या आंदोलनादरम्यान पुस्तकाच्या प्रती फाडताना शायना एनसी यांच्या हातून अनावधानाने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला. ही चूक अनवधानाने झाल्याचे सांगत त्यांनी तत्काळ माफीही मागितली आहे. मात्र, केवळ माफी नको तर महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी शायना एनसी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी आक्रमक मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. या प्रकरणावरून मुंबईपासून नागपूरपर्यंत आंदोलने सुरू असून खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत, तर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे.

लाडक्या बहिणींच्या खात्यातील मदतीचा ओघ थांबला! वर्धा जिल्ह्यात ई-केवायसीचा पेच!

विरोधकांच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा अपमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले असून, उद्धव ठाकरे गट विनाकारण ‘पराचा कावळा’ करत असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, बावनकुळे यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. सोनिया गांधी यांनी पुस्तकात केलेला सावरकरांचा अपमान तुम्हाला मान्य आहे का आणि नसेल तर भूमिका स्पष्ट करा, असा सवाल बावनकुळे यांनी विचारला आहे.

यापूर्वी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यांवर शरद पवार यांनी असहमती दर्शवली होती, मात्र उद्धव ठाकरे गटाने कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. आता पुन्हा एकदा सावरकरांचा अपमान आणि बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी काँग्रेस नेत्यांनी साधे अभिवादनही न केल्याच्या मुद्द्यावरून भाजपने उद्धव ठाकरेंची कोंडी केली आहे.

 

error: Content is protected !!