Protection cover for tigers : शिकाऱ्याची होऊ शकते शिकार!

Forest department keeps a close eye on tiger poachers : वन विभाग Alert Mode वर; वाघांना सुरक्षेचे कवच

Gadchiroli सहा वर्षांत सहा वाघांची शिकार झाली. दीड महिन्यांत ३ बिबट्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप गुढ आहे. त्यात टी-६ वाघीण कुठे गेली, याचं उत्तर मिळालेलं नाही. वाघांची शिकार करणारी टोळी विदर्भात सक्रीय झाली आहे. पण आता वन विभागाने शिकाऱ्याचीच शिकार करण्याची तयारी केली आहे. वाघांना सुरक्षेचे कवच देऊन शिकार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

Gadchiroli जिल्ह्यात २०२३ मधील वाघांच्या शिकारीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वन विभाग अलर्ट मोडवर आहे. प्रत्येक गावांमध्ये परजिल्हा व परराज्यातून स्थलांतरीत झालेल्या जमातींवर करडी नजर आहे. हरयाणा राज्यातील बहेलिया टोळीने २०२३ मध्ये फेब्रुवारी ते जून महिन्याच्या दरम्यान जिल्ह्याच्या चातगाव वन परिक्षेत्रातील दोन वाघांची शिकार आंबेशिवणी, बोथेडा, दिभना जंगलात केली होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली होती.

CM Devendra Fadnavis : विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र Number One!

अलीकडच्या सहा वर्षांत जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असतानाच विविध कारणांमुळे वाघांचा मृत्यूसुद्धा होत आहे. काही प्रकरणांत ही नैसर्गिक बाब असली तरी बिबट्यांसह वाघांच्या शिकारीचे गुन्हेसुद्धा घडलेले आहेत. वर्षभरापूर्वी अमिर्झा गावालगत वाघाची शिकार परिसराच्या लोकांनी केली होती.

जिल्ह्यात हरिण, चितळ, सांबर, रानडुकरे व अन्य प्राण्यांची शिकार झाल्याचे आठवडा-पंधरवड्यात उघडकीस येते. ह्या शिकारींवर पायबंद घालण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे. विभागाशी समन्वय साधून स्थलांतरित लोकांवर वॉच ठेवला जाणार आहे, तसेच त्यांचे ओळख पटविण्यासाठी त्यांच्याकडील दस्तावेजाची पडताळणी केली जाणार आहे, अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांकडून मिळाली.

गडचिरोली व वडसा वन विभागातील १० लोकांचा बळी घेणारी टी- ६ वाघीण कुठेही दिसून येत नाही. ह्या वाघिणीचे तीन बछडेसुद्धा २०२३ मध्ये अमिर्झा उपक्षेत्राच्या दिभना गावाच्या जंगलात मृतावस्थेत आढळले होते. ही वाघीण कुठे बेपत्ता झाली. या वाघिणीची शिकार झाली की, काय झाले, याबाबत वन विभागाकडेसुद्धा माहिती उपलब्ध नाही.

गेल्या दीड महिन्यांत तीन बिबट्यांचा मृत्यू झालेला आहे. १७ डिसेंबर रोजी पोर्ला वन परिक्षेत्रातील डोंगरसावंगी शेतशिवारात मादी बिबट, ३१ डिसेंबर २०२४ रोजी नागरवाही जंगलात मादी बिबट, २८ जानेवारी रोजी कोटगलजवळ वैनगंगा नदीत नर बिबट मृत आढळला.

Siddharth Kharat : विकासात राजकारणाला Scope नाही!

जिल्ह्यात २०१७ ते २०२३ या कालावधीत सहा वाघांची शिकार करण्यात आली. यात तीन वाघांची शिकार विद्युत करंट लावून, दोन वाघांची शिकार पायात फासे लावून तर एका वाघाची शिकार मृत गायीवर विषप्रयोगाने करण्यात आली. सहा वाघांपैकी काही वाघांचा नवा अधिवास शोधण्याच्या वर्चस्वातून तर काही वाघांचा आजाराने मृत्यू झालेला आहे.