Online betting network is spreaded till Dubai : अकोला पोलीस मास्टरमाइंड आरोपीच्या शोधात
Akola अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन सट्टा गेमिंगचा व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. मंगळवारी रात्री अकोला गुन्हे शाखा पोलिसांनी बार्शीटाकळी परिसरात छापा टाकून डझनभर आरोपींना अटक केली. या कारवाईत २८ लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणातील मुख्य मास्टरमाइंड आरोपीचे धागेदोरे दुबईपर्यंत जोडले गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकोला पोलिस या प्रकरणाची बारकाईने चौकशी करत आहेत. बार्शीटाकळी परिसरात १५ दिवसांपूर्वी ६/१० नावाने ऑनलाइन सट्टा गेमिंग व्यवसाय सुरू करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती, त्यानंतर कारवाईचे नियोजन करण्यात आले.
तपासादरम्यान असेही समोर आले आहे की, अटक केलेले आरोपी ऑनलाइन गेमिंग सट्ट्यात फक्त एक मोहरा होते. या कारभारामागे अनेक मोठी नावे असल्याचे संकेत मिळाले आहेत. काही स्थानिक व्यक्तींनी वेतनाच्या आधारावर कामगारांना ओळखपत्रे (ID) तयार करून लोकांना पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम दिले होते. अकोला पोलिसांनी केलेल्या कारवाईत असे आढळले की, प्रत्येक आरोपीला २० हजार रुपये वेतन देण्यात येत होते.
Raksha Khadse : आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तम पायाभूत सुविधा निर्माण केल्या
अकोला पोलिसांच्या कारवाईची बातमी पसरताच संबंधित व्यक्तींनी तातडीने ऑनलाइन अकाउंट्स लॉगआउट करून सट्टा नेटवर्क बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी स्थानिक आरोपींच्या मोबाईल लोकेशनचा माग काढत कारवाई अंमलात आणली. ऑनलाइन जुगाराच्या विळख्यात अनेक लोक अडकत असून त्यामुळे अनेकांचे जीवन उध्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे.








