Breaking

Accident on Samruddhi Mahamarg : प्रयागराजवरून परतताना अपघात; दोघे ठार

 

Accident while returning from Prayagraj; Two women died : समृद्धी महामार्गावरील घटनेत कुटुंबावर काळाचा घाला

Wardha ओव्हरटेक करताना कार चालकाला डुलकी आली. त्यामुळे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन बॅरिकेडला धडकली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालकासह तिघे जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात समृद्धी महामार्गावर येळाकेळी परिसरात झाला.

रमेश्री रामदास (३२), शकुंतला रामकृष्ण (५०), रा. कुंडलो, बेंगळुरू असे मृताचे, तर संजय नांजया (४०), पूर्वीश नरेश (६) व कार चालक नरेश व्यंकटेश (३५), सर्व रा. कुंडलो, बेंगळुरू असे जखमींचे नाव आहे. कार चालक नरेश व्यंकटेश हे आपल्या परिवारासह प्रयागराज येथून के.ए. ५१ एम.एक्स. ८७६१ क्रमांकाच्या कारने समृद्धी महामार्गावरून बेंगळुरूकडे जात होते. येळाकेळी परिसरात समोरील वाहनाला ओव्हरटेक करीत असताना चालकाला डुलकी आल्याने कार अनियंत्रित होऊन उलटली.

Kalmeshwar accident: कळमेश्वरमधील बारूद कारखान्यात स्फोट

कार महामार्गावरील बॅरिकेडला धडकली. यात चालकाची पत्नी आणि बहीण या दोघींचाही जागीच मृत्यू झाला. तर चालकासह त्याचा मुलगा व मित्र यांना दुखापत झाली लागला असून, त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील पोलिस उपनिरीक्षक दिलीप थाटे, हवालदार किशोर येळने, अशोक भोगे, गजानन देवकते यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले.

Accident in Buldhana : प्रवाशांनी भरलेली एसटी दुभाजकावर आदळली!

रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचविले, तर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातात कारचा पूर्णत: चुराडा झाला. याप्रकरणी सावंगी पोलिसांना माहिती देण्यात आली.