School for 10 months; then how about school bus fare for 12 months : शहरासह जिल्हाभरात अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांना ऊत आला आहे
Wardha : शाळा १० महिने व बस भाडे १२ महिन्यांचे घेतले जाते. त्यातही दरवर्षी भाडेवाढ करण्याची मागणी केली जाते. स्कूल बसच्या नावे पालकवर्गाची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
मागील काही वर्षांपासून पालकांचा मराठी शाळांकडे कल कमी झालेला दिसतोय. मात्र, कॉन्व्हेंट आणि इंग्रजी शाळांकडे ओढ वाढला आहे. त्यामुळे शहरासह जिल्हाभरात अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांना ऊत आला आहे. गावखेड्यांतील विद्यार्थीसुद्धा आता इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेताना दिसून येत आहेत. अनेकांना ‘आरटीई’अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश मिळतो; परंतु स्कूल बसचे शुल्क मात्र भरावे लागते. शाळा १० महिने असले तरी बसचालक पालकांकडून १२ महिन्यांचे शुल्क वसूल करत असल्याचे चित्र वर्धा जिल्ह्यात दिसून येत आहे.
High Court Nagpur Bench : ‘त्या’ निर्णयावर फेरविचार शक्य नाही!
शहरातील अनेक शाळांचे शुल्क ५० ते ६० हजार रुपये आकारले जाते. तर स्कूल बस भाडे म्हणून पालकांकडून १८ ते २० हजार रुपये वसूल केले जाते आहेत. शाळेपासून असलेल्या अंतरावरून हे शुल्क आकारावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
मागील काही वर्षांपासून दिवसेंदिवस पुस्तकांचे भाव वाढत आहेत. दुसरीकडे यासोबत लागणाऱ्या वह्या, स्टेशनरी यांचेही दर वाढतीवरच आहेत. विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेश केल्यानंतर शालेय शुल्क स्कूल बसचे शुल्क यांसह स्टेशनरीचा खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. सोबचत काही शाळांकडून ठरवलेल्या दुकानातून स्टेशनरी, कपडे घेण्याचा आग्रह केला जातो. त्यामुळे पालकांना आर्थिक झळ बसत आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे शुल्क मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्वसामान्य पालकांचे आर्थिक गणित पुरते कोलमडत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळी सुट्या व दिवाळी सुट्या वगळल्या तर १२ महिन्यांपैकी केवळ ९ ते १० महिनेच शाळा भरते; परंतु दोन महिन्याचा स्कूल व्हॅनचा खर्च अतिरिक्त वसूल केला जात आहे.