व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nana Patole : विधानसभा अध्यक्ष असताना मी धान खरेदीची चौकशी लावली होती...

Nana Patole : विधानसभा अध्यक्ष असताना मी धान खरेदीची चौकशी लावली होती !

This scheme was introduced when Vilasrao Deshmukh was the Chief Minister : ही योजना विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आणली गेली

Nagpur : भाजप नेते आमदार डॉ. परिणय फुके यांनी राईस मिलच्या भरडईच्या कामातील कथित गैरव्यवहार विधानसभेत मांडण्यासाठी फिक्सिंग झाल्याचा आरोप केला. त्यानंतर संशयाची सुई कुणाकडे, याची चर्चा सुरू झाली. यासंदर्भात आज (१३ मार्च) काँग्रेस नेते नाना पटोले यांना विचारले असता, यापूर्वी सुतळी खरेदीमध्ये पैसे खाल्ले गेले होते. त्यामध्ये सत्तापक्षाचे दलाल सामील होते, असे ते म्हणाले.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, ही योजना विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आणली गेली होती. सुतळी खरेदी, बारदाना खरेदी यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता. सुतळी खरेदी न करताच पैसे खाल्ले गेले. यामध्ये सत्ता पक्षाचे दलाल सामिल आहेत, ही भूमिका आम्ही विधानसभेत मांडली. पुढील काळात यामध्ये लूट न होता ही योजना शेतकऱ्यांसाठी राहावी, ही आमची मागणी आहे.

Nana Patole : परिणय फुके आमच्या सभागृहाचे सदस्य नाहीत !

बाहेरून स्वस्त तांदूळ आणून त्याची रिसायकलिंग करून हात लावला तरी तांदळाचा चुरा होतो. गरीब माणसाच्या खाण्यायोग्य तो तांदूळ नसतो. विधानसभेत हा मुद्दा आम्ही मांडला पुढच्या काळात असं होणार नाही, हे आश्वासन देण्यात आलां आहे. मी स्वतः विधानसभा अध्यक्ष असताना धान खरेदीमध्ये चौकशी लावली होती, असेही नाना पटोले म्हणाले.

शेतकऱ्याच्या आत्महत्येनं हादरला महाराष्ट्र..
होळीच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील एका पुरस्कारप्राप्त तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केली. ज्या शेतकऱ्याला सन्मानित केलं गेलं, असा शेतकरी सुसाईड नोटमध्ये सरकारवर दोष ठेवतो. सोमवारी हा मुद्दा आम्ही अधिवेशनात मांडू. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचा आवाज आम्ही मांडू. यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. राज्यपालाच्या अभिभाषणात आम्ही शेतकऱ्यांना भरपूर दिलं, असं सांगतात. मात्र यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काहीच दिल नाही. होळीच्या दिवशी शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे, हे महाराष्ट्राला हादरवून टाकणारं आहे, असे नाना पटोले म्हणाले.

राज्यातील राजकीय स्थैर्य संपवण्यात भाजपला यश आलं आहे.. वैचारिक व्यवस्थेला निवडून दिल्यावर त्याला विकत घेणं, हे नरेंद्र मोदी यांचे सरकार 2014 मध्ये निवडून आलं, तेव्हापासून सुरू झालं असल्याचा आरोप पटोलेंनी केला. नितेश राणे यांच्यावर त्यांनी सडकून टिका केली. मुख्यमंत्र्यांनी अशा वाचाळ मंत्र्यांना थांबवलं पाहिजे. राज्यातील धार्मिक भावना भडकवणाऱ्यावर कारवाई केली गेली पाहिजे, असे ते म्हणाले.

Vijay Wadettiwar : बीड म्हणजे सापांच्या राजकारणाचं बिळ झालंय !

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल विचारले असता, ते काय बोलले, हे मला माहिती नाही. यावर पवार साहेब उत्तर देतील, असे पटोले म्हणाले. शिंदे व फडणवीस यांच्यातील वाद आता लपून राहिलेला नाही. शिंदेच्या सगळ्या आमदारांचं सुरक्षा कवच काढण्यात आलं आहे. मात्र भाजपच्या आमदाराची सुरक्षा जशास तशी ठेवली आहे.

आनंदाचा शिधा शिंदे एकनाथ शिंदे यांनी सुरू केला होता, तो बंद करण्यात आला आहे. फडणवीस व शिंदे यांच्यातील वाद आता स्पष्ट झाला आहे. राज्यातील कायदा संस्थेची चर्चा विधानसभेत येईल, तेव्हा या आमदारांना वाय प्लस दिलेली सुरक्षा कोणत्या आधारावर दिली, याचे उत्तर आम्ही मुख्यमंत्र्यांना मागू आणि त्यांनी ते दिलं पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.

error: Content is protected !!