Breaking

Nagpur riots : मुख्यमंत्र्यांनी घेतला यू-टर्न, नासीर खान यांचा आरोप

Chief Minister Devendra Fadanvis takes U-turn, Nasir Khan alleges : नागपुरात दंगलीच्या आरोपींची घरे पाडणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान

Nagpur : ज्या औरंगजेबच्या कबरीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्वी वेगळे काही बोलत होते. त्यांनी अचानक यू-टर्न घेतला. आता त्यांना त्या कबरीला केंद्रीय पुरातत्व विभागाचे संरक्षण असल्याची उपरती झाली व औरंगजेबाची कबर तोडली जाऊ शकत नसल्याचे विधान त्यांनी केले. आता ते सांगतात यात कायद्याचे बंधन आहे, नंतर बघू, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले असल्याचा रोप सामाजिक कार्यकर्ते नासिर खान यांनी केला.

नागपूरात घडलेल्या दंगलीची पार्श्वभूमी ही एका गटाने तयार केली. त्यांना मूळात औरंगजेबच्या कबरीसाठी आंदोलन करण्याची परवानगीच गणेशपेठ किवा कोतवाली पोलिस ठाण्यातून मिळाली नव्हती, असा आरोपही खान यांनी केला. माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती मागवली असता, गणेशपेठ पोलिसांनी आंदोलन स्थळ हे त्यांच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे उत्तर आम्हाला दिले.

Bacchu Kadu : उशाला धरण, तरी शेतकऱ्याच्या नशिबी मरण!

कोतवाली पोलिस ठाण्यात माहिती मागितली असता अशी कोणतीही परवानगी बजरंग दल किवा विश्‍व हिंदू परिषदेला कोतवाली पोलिस ठाण्यातून मिळाली नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. या गटाने आंदोलनाचे फक्त पत्र कोतवाली पोलिस ठाण्याला दिले होते, असे नासिर खान यांनी सांगितले. याचा अर्थ दूपारी सव्वा बाराच्या सुमारास जे आंदोलन झाले होते, तेच मुळात कायद्याला धरुन नव्हते, त्यात आंदोलनाच्या वेळी जी हिरवी चादर जाळण्यात आली, त्यात कुराणची आयात असल्याने एका गटाच्या भावना दूखावल्या.

Zilla Parishad Budget : बांधकाम विभागासाठी ६ कोटी, आरोग्यासाठी १ कोटी!

काही तरुणांनी हा प्रकार बघून गणेशपेठ पोलिसांकडे धाव घेतली व आंदोलनकर्त्यांना रोखण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी त्या तिघा-चौघांनाच ठाण्याच्या आत घेऊन दंडूकेशाही दाखवली. त्यांना मारहाण केली. परिणामी फहीम खान याने पुढाकार घेत मोठा जमाव गणेशपेठ पोलिस ठाण्यात नेला व हिरवी चादर जाळणा-या आंदोलनकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पुढे सगळा अनर्थ घडला. ज्या वेळी तिघे-चौघे तरुण गणेशपेठ पोलिस ठाण्यात गेले व आंदोलनकर्त्यांच्या विरोधात तक्रार करीत होते, त्याच वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलनकर्त्यांना हिरवी चादर जाळणे व काठीने तुडवण्यापासून रोखले असते तर पुढील दंगे झालेच नसते, असा दावा नासिर खान यांनी केला.