Breaking

Mahayuti Government : अकोला ७.३८ तर अमरावतीत ८.०३ टक्के रेडीरेकनर दरवाढ!

 

Ready reckoner price hiked by 7.38 percent in Akola and 8.03 percent in Amravati : महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रातील रेडीरेकनर दर निश्चित

Akola महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रांमध्ये 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता खरेदी-विक्रीच्या रेडीरेकनर दरांमध्ये (RRR) लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील सरासरी वाढ 5.95 टक्के नोंदवली गेली असून, सोलापूर महानगरपालिका 10.17 टक्के वाढीसह अग्रस्थानी आहे. उल्हासनगर (9.00%) आणि अमरावती (8.03%) या शहरांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो. अकोला महापालिका क्षेत्रात ७.३९ टक्के दरवाढ केली आहे. त्याचा परिणाम घर हो प्लॉट खरेदीवर होणार असल्याने सर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्न मागणार आहे.

सोलापूरमध्ये सर्वाधिक 10.17 टक्के वाढ झाली आहे. तर उल्हासनगर आणि अमरावतीमध्ये अनुक्रमे 9.00% व 8.03% वाढ करण्यात आली आहे. ठाणे (7.72%), नवी मुंबई (6.75%), नाशिक (7.31%) यांचाही समावेश आहे. सर्वात कमी २.५० टक्के वाढ भिवंडी-निजामपुरमध्ये करण्यात आली आहे. तर नागपूर (NMRDA) आणि चंद्रपूर (MHADA)मध्ये अनुक्रमे 4.23% + 6.60% आणि 2.20% + 7.30% वाढ दाखविण्यात आली आहे. अकोला महापालिका क्षेत्रात ७.३९ दरवाढ झाली आहे.

District Administration : वाढीव निधीवर लोकप्रतिनिधींमध्ये होणार रस्सीखेच!

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये वाढत्या मागणीमुळे आणि विकास प्रकल्पांमुळे रेडीरेकनर दर वाढले आहेत. नागरीकरण, औद्योगिक विस्तार आणि पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या गुंतवणुकीमुळे मालमत्तेच्या किमतीत वाढ झाली आहे. विशेषतः मेट्रो प्रकल्प, स्मार्ट सिटी योजना आणि आयटी पार्क्समुळे मोठ्या शहरांमध्ये ही वाढ दिसून येते.

राज्य शासनाने रेडीरेकनर दरवाढ ही बाजाराच्या मागणी-पुरवठ्यावर आधारित असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांसाठी सरकारने विविध सवलतींचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.

Education Minister of Maharashtra : २४ वर्षांपासून अनुदान नाही, प्राध्यापकांनी टाकले भाजीचे दुकान!

असा होणार परिणाम

घरखरेदी महागणार: वाढत्या रेडीरेकनर दरामुळे स्टॅम्प ड्युटी आणि अन्य करांमध्ये वाढ होईल, ज्याचा थेट परिणाम घरांच्या किमतींवर होईल.
गुंतवणूकदारांचा ओढा: दरवाढीनंतरही स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल राहणार, कारण येत्या काळातही दरवाढ होण्याची शक्यता आहे.
किरायांच्या दरात वाढ: घरांच्या किमती वाढल्याने भाड्याच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.