BJP President Chandrashekhar Bawankule said attacks on Congress President Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगला दिवस निवडला तर त्याला उत्तर देता येईल
Nagpur : आज फार आनंदाचा दिवस आहे. रामनवमी असल्याने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. आजच्या दिवशी तरी काँग्रेस पक्षाने आपली संस्कृती जपली पाहिजे. प्रभू राम आमचे आराध्य दैवत आहे. या राज्याची संस्कृती, देशाची एक संस्कृती आहे. अशावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगला दिवस निवडला तर त्याला उत्तर देता येईल, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
मंत्री बावनकुळे आज (६ एप्रिल) नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आजच्या चांगल्या दिवशी काँग्रेसवर किंवा कुणावरही टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी आधी आपली उंची तपासावी आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलावे. भाजपाचा आज 46वा स्थापना दिवस आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे भूमिपूजन पार पडले.
भाजपचे विदर्भातील कार्यालय विदर्भातील कार्यकर्त्यांच्या सहाय्याने 2 वर्षात बांधून पूर्ण करणार आहोत. महाराष्ट्रात एक कोटी ५१ लाख मेंबरशिप झालेली आहे. बूथ अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडी आम्ही लवकरच करणार आहोत. आज कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायचं आहे. महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांत 36 कार्यालये बांधण्यात येतील. या कार्यालयांना कार्यकर्त्यांनी मदत करावी, असे आवाहन आम्ही केले असल्याचे मंत्री बावनकुळे म्हणाले. टाटा कन्सल्टन्सीकडून हे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Dr. Pankaj Bhoyar : वर्धा जिल्ह्यातील ४० तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट!
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता, संजय राऊत यांना फार मोठा आजार झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मी फार बोलत नाही, असे ते म्हणाले. रामनवमीच्या शोभायात्रेला बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार परवानगी देत नसेल तर तेथील जनता त्यांना उखडून फेकेल, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.








