Breaking

Ganesh Naik : शेतकऱ्याला मारहाण केली, चौकशी समिती नेमणार

Inquiry committee will be appointed in farmer assault case : कठोर कारवाई होणार; वनमंत्री नाईक यांनी दिली ग्वाही

Wardha सेलू तालुक्याच्या हिंगणी बफर झोन परिसरात १४ मार्च रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी व तीन वनरक्षकांनी ६५ वर्षीय आदिवासी शेतकऱ्यास अमानुष मारहाण केली होती. हे प्रकरण विधानसभेत गाजल्यानंतर वनमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. आता आदिवासी विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन चर्चा केली असता त्यांनी विशेष चौकशी समिती गठीत करण्याची ग्वाही दिल्याचे सांगितले.

हिंगणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अभय ताल्हन व तीन वनरक्षकांनी नारायण कौरती या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर आमदार सुमित वानखेडे Sumit Wankhede यांनी लक्षवेधी लावली होती. त्यांच्याच प्रयत्नाने हरीहर भवन, नागपूर येथे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.

Wardha Zilla Parishad : आरोग्य सेवक भरती रखडली, प्रशासनाविरुध्द रोष

या बैठकीत आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ अध्यक्ष चंद्रशेखर मडावी व जिल्हाध्यक्ष शरद आडे यांच्या नेतृत्त्वात पीडित शेतकरी नारायण कौरती, त्यांच्या पत्नी उषा कौरती, सुधाकर कुमरे, शालू परतेकी, मनोहर कुरसंगे, माणिक सलाम, देविदास मंडारी, विनोद कौरती, परसराम उईके, प्रकाश उईके, माणिकर नरपाची, आशा मसराम, शंकर ईवनाथे, ईश्वर ईवनाथे, बेबी कौरती आणि इंद्रजीत बोटरे यांची उपस्थिती होती.

Home Ministry : वित्तीय संस्थांमधील गैरव्यवहार; गृह विभाग Action Mode वर!

शिष्टमंडळाने वनपरिक्षेत्र अधिकारी अभय ताल्हन यांच्याविरुध्द विशेष चौकशी समिती गठीत करून कारवाई करावी, पीडितेला १० लाखांची नुकसानभरपाई द्यावी, त्यांच्या शेताला संरक्षण मिळावे, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता चौकशी समिती गठित केली जाणार असून, यात ताल्हन दोषी आढळल्यास सेवेतून बडतर्फ करण्याची ग्वाही वनमंत्र्यांनी दिली आहे.