व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Water shortage : आढावा बैठकीत 82 गावांतील पाणीटंचाई गाजली; हलगर्जी करणारे अधिकारी...

Water shortage : आढावा बैठकीत 82 गावांतील पाणीटंचाई गाजली; हलगर्जी करणारे अधिकारी रडारवर

Water scarcity in 82 villages dominates the review meeting : कायमस्वरूपी उपाय करा, अन्यथा कारवाई करण्याचा आमदाराचा इशारा

Deulgao raja तालुक्यात गत काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या तापमानात पाणीटंचाईची तीव्रताही वाढली आहे. वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राजकीय पातळीवर हालचाली वेग घेतला आहे. सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे MLA Manoj Kayande यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील 60 आणि चिखली तालुक्यातील 22 गावांच्या पाणीटंचाईचा आढावा घेतला.

पाणीटंचाईचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तात्पुरत्या नव्हे तर कायमस्वरूपी उपाययोजना करा, अन्यथा हलगर्जी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होईल,” असा इशाराच आमदार कायंदे यांनी दिला.

देऊळगाव राजा येथे आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत आमदार कायंदे यांनी तालुक्यातील स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. समाधानकारक पावसाच्या पार्श्वभूमीवरही काही गावांमध्ये फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाई जाणवत असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Anil Deshmukh : खतांच्या किमतीत ८५ टक्क्यांपर्यंत वाढ; सरकारकडून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम

देऊळगाव राजा तालुक्यातील ६० गावे तसेच मतदारसंघातील चिखली तालुक्यातील २२ गावांची गावनिहाय माहिती घेऊन पाणीटंचाईची तीव्रता समजून घेतली. “वारंवार टंचाई भोगणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी जलस्रोत निर्माण करून ठोस कृती आराखडा सादर करा,” असे आदेश त्यांनी दिले. फक्त अहवाल सादर करून समस्या सुटणार नाही, असे स्पष्ट करत आमदार कायंदे यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

शासनाच्या पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात किती कार्यरत आहेत, याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे त्यांनी सुनावले. जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधींच्या योजना मंजूर होऊनही त्या अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. मुदत संपूनही कामे रखडल्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आमदारांनी दिले. तसेच पाणीटंचाई संदर्भातील सर्व प्रस्तावांची सद्यस्थिती अहवालासह सादर करण्याचे आदेशही देण्यात आले. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याबरोबरच दीर्घकालीन नियोजनावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.

Youth Congress : युवक काँग्रेसने कथास्थळीच जाळला धीरेंद्र शास्त्रींचा पुतळा

“टाळाटाळ सहन केली जाणार नाही,” असा ठाम इशारा देत आमदार कायंदे यांनी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली. या बैठकीस नायब तहसीलदार सायली जाधव, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी तसेच तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि विविध विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!