‘Guardian Minister should visit the fields and conduct an on-the-spot inspection,’ farmers demand : क्रांतिकारी शेतकरी संघटनेची उपहासात्मक मोहीम; ४५ दिवसांपासून पावसाचा खंड, शेतकऱ्यांमध्ये नाराजी
Akola जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि मका आदी पिके संकटात सापडली आहेत. अनेक भागांत तब्बल ४५ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड असल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपहासात्मक मोहीम सुरू केली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
Amravati Municipal corporation : अमरावतीकरांवर वाढीव मालमत्ता कराचे ओझे कायम!
संघटनेने समाजमाध्यमांवर पोस्ट करून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी बांधावर येऊन शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करावी, असा आग्रह धरला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन तातडीने मदतीची घोषणा करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
‘पिकांची पाहणी व्हावी’
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पाण्याअभावी पिके वाळू लागली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या परिस्थितीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
Local Body Election : पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत चार चेहरे; ‘पुढचा डाव’ कुणाचा?
‘पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर यावे’
पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी आणि पिकांच्या नुकसानीबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.








