व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Amit Thackeray : अमित ठाकरेंनी अचानक अनावरण केलेला शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला

Amit Thackeray : अमित ठाकरेंनी अचानक अनावरण केलेला शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला

navi mumbai shivaji maharaj statue controversy ashish shelar reaction : मनसेची आक्रमक भूमिका, आणि आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

Mumbai : नवी मुंबईतील नेरूळ येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतिक्षेत कपड्याने झाकून ठेवण्यात आला होता. नेमकं पुतळा तयार असूनही त्याचे उद्घाटन का होत नाही यावरून परिसरात नाराजी व्यक्त होत असतानाच, मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी अचानक हा पुतळा अनावरण करून टाकला. या कृतीनंतर पोलिस आणि मनसैनिकांमध्ये चढाओढ, ढकलाढकली झाली आणि नेरूळ पोलिस ठाण्यात अमित ठाकरे तसेच 70 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

अनावरणानंतर काही तासातच महानगरपालिकेने पुन्हा शिवरायांचा पुतळा आणि सभोवताली असलेला मंडप तसाच जुनाट, खराब कपड्याने झाकून ठेवला. या कृतीमुळे मनसे आक्रमक झाली असून ‘हा अपमान सहन केला जाणार नाही’ अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. संपूर्ण घटनेवर आता राज्याचे मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली असून, पुतळ्याचं पूर्ण काम झाल्यावर तातडीने उद्घाटन व्हायला हवं हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

subsidy scheme : ब्राह्मण, राजपूत, आर्यवैश्य समाजासाठी महायुती सरकारची मोठी योजना !

अमित ठाकरे यांनी परवानगी न घेता केलेल्या अनावरणा विषयी आशिष शेलार यांना विचारण्यात आले असता, त्यांनी सांगितले की, “या प्रकरणाची अधिक माहिती संबंधित मंत्रालय देईल. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन तातडीने व्हायला हवे. हेच आमचे स्पष्ट मत आहे.”

त्यांच्या या वक्तव्यामुळे पुतळ्याच्या उद्घाटनात झालेल्या उशिरीबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेवर अप्रत्यक्ष टीका झाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर अमित ठाकरे यांनी जोरदार प्रतिक्रिया नोंदवली. “माझ्या सहकाऱ्यांसोबत विधिवत आरती करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले. पण दुसऱ्याच दिवशी हा पुतळा पुन्हा घाणेरड्या कापडाने झाकण्यात आला. हे कुठले प्रशासन? महाराजांच्या दर्शनाचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे. आम्ही पुन्हा तो कपडा काढून फेकू,” असे त्यांनी ठासून सांगितले.

Local Body Elections : अमरावतीत महायुतीत फूट? शिवसेना स्वबळावर मैदानात

तसेच त्यांनी पुढे म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान एका क्षणासाठीही सहन करणार नाही. महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या सन्मानासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही आनंदाने करू. माझ्या राजकीय आयुष्यातली पहिली केस ही महाराजांसाठी आहे आणि याचा मला अभिमान आहे.”

नवी मुंबईतील नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला. पुतळ्याचे काम पूर्ण होऊन चार ते सहा महिने उलटून गेले, तरीही अनावरण न झाल्याने परिसरातील नागरिक आणि शिवप्रेमी नाराज होते. पुतळा अनेक महिन्यांपासून फाटलेल्या, खराब कपड्याने झाकून ठेवण्यात आला होता.

Local Body Elections : अमरावतीत रिपाइंचे ऐक्य साधण्याची तयारी!

मनसेचे नेते अमित ठाकरे कोपरखैरणे येथे झालेल्या मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी आले असताना त्यांना ही बाब समजली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह थेट पुतळ्याजवळ जाऊन, पोलिसांच्या उपस्थितीतच अनावरण केले. यावेळी मनसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

पण अनावरणानंतरही महानगरपालिकेच्या पुतळा पुन्हा झाकण्याच्या कृतीवरून हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. मनसे आधीच आक्रमक झाली असून पुढील काही दिवसांत हे प्रकरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

_____

error: Content is protected !!