व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ashish Shelar, Manoj Jarange : शिवराळ भाषा खपवून घेणार नाही, आशिष शेलारांचा...

Ashish Shelar, Manoj Jarange : शिवराळ भाषा खपवून घेणार नाही, आशिष शेलारांचा जरांगेंना थेट इशारा

“We will not tolerate abusive language,” Ashish Shelar warns Manoj Jarange : आंदोलनाच्या भूमिकेवर घेतला संशय, पवारांसह ठाकरेंवरही डागली तोफ

Mumbai मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईच्या दिशेने कूच करणारे मनोज जरांगे आणि महायुती सरकारमधील संघर्ष आता कमालीचा पेटला असून जरांगे यांच्या चिथावणीखोर भाषेवर भाजपने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जरांगे यांच्याकडून वारंवार होत असलेला एकेरी उल्लेख आणि शिवराळ भाषा यापुढे अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा थेट इशारा भाजप नेते तथा कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी महायुती सरकारची बाजू मांडताना दिला आहे.

जरांगे यांच्या १३ पैकी १२ मागण्या सरकारने आधीच मान्य केल्या आहेत आणि उरलेल्या काही बाबी न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या असतानाही ऐन सणासुदीच्या काळात मुंबईत येऊन वाहतुकीची कोंडी करणे आणि सर्वसामान्यांना वेठीस धरणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. आजही सरकार चर्चेसाठी तयार असून संवादाचे दरवाजे बंद केलेले नाहीत, असे सांगतानाच शेलार यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या वेळेवर आणि हेतूवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

illegal moneylending : अवैध सावकारीवरील शिक्षेत वाढ; सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या लढ्याला यश

जरांगे यांच्या आंदोलनामागे नेमका कोणाचा हात आहे हे माहित नसले तरी त्यांच्या भूमिकेवर तीव्र शंका उपस्थित करत शेलार यांनी विरोधी नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. फडणवीस आणि शिंदे यांनी मराठा समाजाला ईडब्ल्यूएसअंतर्गत १० टक्के आरक्षण दिले, कुणबी-मराठा नोंद असणाऱ्यांना दाखले दिले आणि समाजासाठी सर्वतोपरी निर्णय घेतले, तरीही त्यांच्यावरच सातत्याने आरोप केले जात आहेत.

Vidarbha Farmers : शेतकऱ्यांच्या व्यथांसाठी छातीवर दगड; अकोल्यात शंभू सेनेचे अभिनव आंदोलन

दुसरीकडे ज्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात मराठा समाजाचे आरक्षण घालवले आणि समाजासाठी काहीच केले नाही, त्यांच्याबाबत मात्र जरांगे एक शब्दही बोलायला तयार नाहीत. ज्यांनी आरक्षण दिले त्यांच्यावर टीका करायची आणि ज्यांनी आरक्षण घालवले त्यांच्याबाबत मौन बाळगायचे, या जरांगे यांच्या दुटप्पी भूमिकेमागे कोणाची फूस आहे याचा खुलासा आता जरांगे यांनीच करावा, असे उघडे आव्हान देत भाजप आता जरांगे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचे शेलार यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.

error: Content is protected !!