rupali-chakankar-resignation-order-cm-devendra-fadnavis-ashok-kharat-case : अशोक खरात प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
rupali-chakankar
Mumbai :नाशिकमधील गाजलेल्या अशोक खरात प्रकरणात आता मोठी राजकीय घडामोड समोर आली असून रुपाली चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अशोक खरातवर महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाल्यानंतर या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत होते. दरम्यान, रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे फोटो तसेच पाद्यपूजेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती. विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती.
Sandip joshi : मला पुन्हा राजकारणात सक्रिय व्हायचं आहे ! आमदार संदीप जोशी यांचा यू-टर्न
राजीनाम्याचा दबाव वाढत असताना रुपाली चाकणकर यांनी मुंबईतील ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांना तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदावरून त्यांचा राजीनामा होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे.
DPC NAGPUR : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याच्या डीपीसीला अच्छे दिन, १६७ कोटींची पडली भर
रुपाली चाकणकर या सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असून त्यांना राज्यमंत्री दर्जा आहे. या प्रकरणामुळे त्यांच्या पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचा सूर विरोधकांकडून उमटत होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. सुषमा अंधारे यांनी तर चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून नार्को टेस्ट करण्याचीही मागणी केली होती.
दरम्यान, या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणे हा गुन्हा ठरू शकत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून सर्व आरोपांना पुराव्यासह उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी यापूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
Katol blast : राऊळगाव कंपनीतील स्फोटाची न्यायालयाने घेतली गंभीर दखल
तसेच, या प्रकरणात पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी रुपाली चाकणकर लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. यामध्ये त्या स्वतःवर झालेले आरोप आणि खरात प्रकरणाशी संबंधित सर्व मुद्द्यांवर स्पष्टीकरण देणार आहेत.
दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी ठराविक वेळेत राजीनामा न दिल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्याने या प्रकरणाचे राजकीय पडसाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
अशोक खरात प्रकरणाने आधीच राज्यभर संतापाची लाट उसळली असताना आता मुख्यमंत्री स्तरावरून आलेल्या या आदेशामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. येत्या काही तासांत रुपाली चाकणकर काय निर्णय घेतात आणि या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
___








