व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ayodhya donation scam : ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह: राम मंदिर देणगी घोटाळ्यावरून...

Ayodhya donation scam : ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह: राम मंदिर देणगी घोटाळ्यावरून काँग्रेस आक्रमक; नागपुरात उद्या आंदोलन

Congress to stage protest against government on Ayodhya Ram mandir donation scam : काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे करणार नेतृत्व

Nagpur अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळ्याचे पडसाद आता देशभरात उमटू लागले असून, या मुद्द्यावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. राममंदिर निर्मितीसाठी आघाडीवर असणारेच या कथित घोटाळ्यात सामील असल्याने सत्ताधारी भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.

विरोधकांनी या मुद्द्यावरून देशपातळीवर सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आंदोलनानंतर आता काँग्रेसनेही भाजपविरोधात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह पुकारला आहे. श्रीराम भक्तांशी केलेला विश्वासघात अजिबात सहन केला जाणार नाही आणि भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, या मागणीसाठी उद्या, गुरुवारी सकाळी १० वाजता सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील पोद्दारेश्वर राम मंदिरासमोर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल गुडधे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन केले जाणार आहे.

Gulf tensions : आखातात तणाव पुन्हा शिगेला, अमेरिका-इराण युद्धबंदीवर प्रश्नचिन्ह

विरोधात असताना अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठी भाजपने देशव्यापी आंदोलन छेडले होते. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या रथयात्रेने देशभरातील वातावरण ढवळून निघाले होते आणि हेच आंदोलन भाजपला सत्तेच्या खुर्चीपर्यंत घेऊन गेले.

Devendra Fs : ‘शरद पवार गट एनडीएमध्ये येणार नाही’, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट संकेत

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येत भव्यदिव्य राममंदिराची निर्मितीही करण्यात आली. मात्र, आता अयोध्येत येणारे दान आणि त्यातील कथित गैरव्यवहार हीच भाजपसमोर सर्वात मोठी अडचण बनली आहे. ज्या मुद्द्याने भाजपला सत्तेचा मार्ग दाखवला, त्याच राम मंदिराच्या देणगी घोटाळ्यावरून आता विरोधक देशपातळीवर आक्रमक झाल्याने सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली आहे.

error: Content is protected !!