व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण निवडणुकांची वाट न पाहता दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावा!

निवडणुकांची वाट न पाहता दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावा!

आमदार बच्चू कडू यांचा शिवसैनिकांना पंचसूत्री कार्यक्रम; अन्यायाविरोधात आंदोलनाचे निर्देश

Akola : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दुष्काळी परिस्थितीमुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुकांची वाट न पाहता दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांच्या मदतीसाठी थेट मैदानात उतरा, असे निर्देश पश्चिम विदर्भातील शिवसेनेचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्यांनी शिवसैनिकांना पंचसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.

अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार कडू यांनी पक्षसंघटनेच्या बळकटीकरणासह दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी विविध सूचना केल्या. पंचसूत्री कार्यक्रम गावागावांत आणि तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमांचे प्रभावी नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चापूर्वीच शरद पवार गटाचा मोठा डाव

नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी थेट मैदानात उतरा

जिल्ह्यातील विविध सर्कल, तालुके आणि शहरी भागांमध्ये नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. या तक्रारींच्या निवारणासाठी कोणाचीही वाट न पाहता शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा. ज्या ठिकाणी अन्याय होईल, त्या ठिकाणी ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारावा, असे निर्देशही आमदार कडू यांनी दिले.

बैठकीला शिवसेना जिल्हा विशेष प्रभारी ललित वानखडे, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे, ज्येष्ठ नेते तथा जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख उषा विर्क, जिल्हाप्रमुख अश्विन नवले, मंगेश काळे, कुलदीप वसु, महानगरप्रमुख राजेश मिश्रा, युवा प्रदेश सचिव विठ्ठल सरप, डॉ. अशोक ओळंबे, निवासी उपजिल्हाप्रमुख संतोष अनासने, माजी महानगरप्रमुख योगेश अग्रवाल, दीपक बोडखे, तरुण बगेरे आणि प्रणव तायडे यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, उपजिल्हाप्रमुख आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

error: Content is protected !!