Relatives of school founders became principals : शिक्षण अधिकाऱ्यांच्या मान्यतेने झाल्या आहेत आहेत
Bhandara राज्यात शिक्षण क्षेत्रात मुख्याध्यापक व शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेत अनियमितता समोर येत असतानाच भंडारा जिल्ह्यात आणखी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळांमध्ये संस्थाचालकांनी आपल्या नातेवाईकांना मुख्याध्यापक पदावर नियुक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.
भंडारा जिल्ह्यात अशा ३० ते ३५ मुख्याध्यापकांची नियुक्ती झाली आहे. यामध्ये वरिष्ठ शिक्षकांना डावलून संस्थाचालकांनी दबावाखाली आपल्या कुटुंबातील व्यक्तींना मुख्याध्यापक पदावर बसवले आहे. या सर्व नियुक्त्या दीड ते दोन वर्षांपूर्वीच्या कालावधीत तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांच्या मान्यतेने झाल्या आहेत, असे समजते.
विशेष म्हणजे लाखनी तालुक्यातील एका खाजगी अनुदानित शाळेत संस्थाचालकाच्या मुलाला थेट मुख्याध्यापकपदाची मान्यता मिळाली. या प्रकरणात नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह शिक्षण विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर शिक्षक संघटनांनी आवाज उठवला असून विविध प्रकारच्या तक्रारींनी शिक्षण विभागाला हादरवून सोडले आहे.
Vidarbha Farmers : मुख्यमंत्र्यांना देणार होते आत्महत्याग्रस्त गावातील माती
मुख्याध्यापक पदासाठी नियम काय म्हणतो?
सरकारी नियमानुसार सलग पाच वर्ष शिक्षक पदावर कार्यरत असलेला शिक्षकच वरिष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदासाठी पात्र ठरतो. मात्र भंडारा जिल्ह्यात या नियमाला धाब्यावर बसवून कुटुंबीय व नातेवाईकांना वरीष्ठांना डावलून पद देण्यात आले. शिक्षण विभागाकडून यासाठी कथितरीत्या आर्थिक देवाणघेवाण झाल्याचेही बोलले जात आहे.
गोंदियाप्रमाणे भंडाऱ्यातही चौकशीची गरज
गोंदिया जिल्ह्यात २०२० ते २०२४ दरम्यान शिक्षक व मुख्याध्यापकांच्या नियुक्तीच्या संदर्भात चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. त्याच धर्तीवर भंडारा जिल्ह्यातही अशाच पद्धतीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा शिक्षण विभागावर विश्वास राहणार नाही, अशी भावना शिक्षक संघटनांतून व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील अनियमितता उघड होत असताना, शिक्षण क्षेत्रातील स्वच्छता राखण्यासाठी प्रामाणिक तपास आणि योग्य ती कारवाई होणे अत्यावश्यक ठरत आहे. अन्यथा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या ध्येयाला मोठा धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.








