Bicycle rally : सायकल रॅलीतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश 

Call for widespread awareness to increase the birth rate of girls : मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन

Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील मुलीचा जन्मदराचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. गर्भलिंग निदान, तपासणी, कन्याभ्रूण हत्या, बालविवाह यांसारख्या अनिष्ठ प्रथांना आळा घालण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाची व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेस १० वर्षपूर्तीनिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीची सुरूवात केली. यावेळी शाळांचे विद्यार्थी, महिला शिक्षक सहभागी झाल्या होत्या.

BJP Internal politics : आमदार प्रकाश भारसाकळेंच्या विरोधात रोष

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, मुलींचा घटता जन्मदर ही एक सामाजिक समस्या आहे. ही समस्या ती सोडविण्यासाठी प्रत्येकाने कटीबद्ध होणे आवश्यक आहे. यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रबोधन, जनजागृती करुन लोकशिक्षण व्हायला हवे. हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. समाजाचे संतुलन साधण्यासाठी महिला व पुरुषांचे प्रमाण योग्य हवे. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही मोहिम मर्यादित कालावधीसाठी न राबविता त्यांची व्यापक स्वरुपात अंमलबजावणी करावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थितांना बेटी बचाओ बेटी पढाओची शपथ देऊन स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सायकल रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरु झाली. कारंजा चौक, बोंडे सरकार चौकमार्गे भारत विद्यालय येथे रॅलीचा समारोप झाला.

Maharashtra Traffic police : वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून घ्यायचे आहेत २ हजार ४२९ कोटी रुपये!

या रॅलीमध्ये जिल्हा परिषदचे अधिकारी, कर्मचारी तसेच भारत विद्यालय, प्रबोधनी विद्यालय, शारदा ज्ञानपीढ व एडेड हायस्कूलच्या विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेस १० वर्षपूर्तीनिमित्त विविध विभागांमार्फत 24 जानेवारी ते 8 मार्चपर्यंत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले यांनी दिली.