व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bjp event row : ‘हा तर जातीचा वाद… तुमच्या दैवताची शपथ घेऊन...

Bjp event row : ‘हा तर जातीचा वाद… तुमच्या दैवताची शपथ घेऊन सांगा’ भाजप नेत्यांमध्ये राडा

 

medha-kulkarni-serious-allegations-on-abhimanyu-pawar-bjp-pune-event-row : अभिमन्यू पवारांवर मेधा कुलकर्णींचे गंभीर आरोप

Pune: पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सारथी संस्थेच्या कार्यक्रमात भाजपमधील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली. युपीएससी आणि एमपीएससी परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. मात्र, कार्यक्रमात पहिल्या रांगेतील आसनव्यवस्थेवरून खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात वाद झाल्याची घटना घडली. या वादानंतर मेधा कुलकर्णी संतप्त होत कार्यक्रमस्थळावरून निघून गेल्या. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिमन्यू पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.

मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, त्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी आणि सारथी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन करत, होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उभारण्यात आलेली ही व्यवस्था कौतुकास्पद असल्याचे म्हटले.

त्या म्हणाल्या की, कार्यक्रमस्थळी पहिल्या रांगेत काही खुर्च्या रिकाम्या होत्या. अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक मान्यवर उपस्थित नव्हते. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार खासदार म्हणून त्यांना पहिल्या रांगेत बसण्याची विनंती केली. तसेच महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनाही त्या ठिकाणी बसण्यास हरकत नसल्याचे आपण अधिकाऱ्यांना सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.

Australian football league: ऑस्ट्रेलियात दुमदुमली शिवगर्जना; AFL सामन्यात नागपूरच्या श्रेया सेलोकरसह ‘शिवगर्जना’ पथकाचा थरार

याचवेळी आमदार अभिमन्यू पवार यांना त्या जागेवर बसायचे होते आणि त्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती, असा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला. यावेळी अभिमन्यू पवार यांनी, “हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही तिथे बसलात तर वाद होईल,” असे वक्तव्य केल्याचा दावा त्यांनी केला. हा विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम असताना त्यात जातीचा विषय आणण्याची गरज काय होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Sudhir mungantiwar : आधुनिक मोरवा विमानतळासाठी जमीन अधिग्रहण व १८०० मीटर धावपट्टीची मुनगंटीवारांची जोरदार मागणी

या वादानंतर नरेंद्र पाटील यांनी अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना मेधा कुलकर्णी यांनी, “अभिमन्यू पवार यांनी हे वाक्य बोलले की नाही, हे त्यांनी त्यांच्या दैवताची शपथ घेऊन सांगावे,” असे आव्हान दिले. तसेच आपण केलेले आरोप सत्य असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

दरम्यान, या घटनेमुळे पुण्यातील भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कार्यक्रमातील आसनव्यवस्थेवरून सुरू झालेला वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला असून या प्रकरणावर आमदार अभिमन्यू पवार यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या वादावर पुढे काय घडामोडी होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

__

error: Content is protected !!