व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश Australian football league: ऑस्ट्रेलियात दुमदुमली शिवगर्जना; AFL सामन्यात नागपूरच्या श्रेया सेलोकरसह ‘शिवगर्जना’...

Australian football league: ऑस्ट्रेलियात दुमदुमली शिवगर्जना; AFL सामन्यात नागपूरच्या श्रेया सेलोकरसह ‘शिवगर्जना’ पथकाचा थरार

Thrilling performance by the Shivgarjana team, featuring Nagpur’s Shreya Selokar, at the AFL match : महाराष्ट्राची परंपरा, शौर्य आणि सांस्कृतिक अभिमान परदेशात पोहोचवण्याचा बहुमान

Nagpur ओस्ट्रेलियाच्या सिडनी येथील स्टेडियम मध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची एक अनोखी आणि देदीप्यमान झलक पाहायला मिळली. येथे पार पडलेल्या Australian Football League सामन्यात ‘GWS Giants’ आणि ‘Carlton’ यांच्यातील रोमांचक लढतीपूर्वी ‘शिवगर्जना ढोल-ताशा पथकाने आपल्या जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थित हजारो प्रेक्षकांची मने जिंकली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील एवढ्या मोठ्या क्रीडा मंचावर ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण मैदान दुमदुमून गेले होते. महाराष्ट्राची परंपरा, शौर्य आणि सांस्कृतिक अभिमान परदेशात पोहोचवण्याचा हा बहुमान या पथकाने मिळवला असून, यामुळे ऑस्ट्रेलियातील बहुसांस्कृतिक समाजात मराठी संस्कृतीची ओळख अधिक दृढ झाली आहे.

परदेशात राहूनही महाराष्ट्राच्या पारंपरिक वाद्यकलेचा आणि सांस्कृतिक वारशाचा अभिमानाने प्रसार करणारे ‘शिवगर्जना ढोल-ताशा पथक (Sydney)’ हा एक उत्साही सांस्कृतिक समूह आहे. ढोल-ताशांच्या माध्यमातून मराठी परंपरा, एकता आणि उत्साहाची भावना पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे पथक सातत्याने करत आहे. या दिमाखदार सोहळ्यात ताशा आणि ढोल वादक कलाकारांनी आपल्या अचूक आणि तालबद्ध सादरीकरणातून स्टेडियममधील क्रीडारसिकांना मंत्रमुग्ध केले. या सादरीकरणाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, यात नागपूरची लेक श्रेया सेलोकर हिने देखील सहभाग घेतला होता. श्रेयाने या आंतरराष्ट्रीय मंचावर नागपूरचे अभिमानास्पद प्रतिनिधित्व केल्यामुळे नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर अधिक उजळून निघाला असून, प्रत्येक नागपूरकरासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे.

Sudhir mungantiwar : आधुनिक मोरवा विमानतळासाठी जमीन अधिग्रहण व १८०० मीटर धावपट्टीची मुनगंटीवारांची जोरदार मागणी

या सादरीकरणातील प्रत्येक कलाकाराच्या वादनातून शिस्त, एकता आणि महाराष्ट्राच्या लोककलेची ताकेत स्पष्टपणे दिसून येत होती. ढोल-ताशा ही केवळ एक कला नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि सामूहिक भावनेचा एक जिवंत अनुभव आहे, याची प्रचिती यावेळी आली. संगीत, ताल आणि अथांग ऊर्जेच्या माध्यमातून शिवगर्जना पथकाने ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेची ओळख करून दिली. हजारो किलोमीटर दूर असलेल्या भूमीवरही आपल्या मातीचा आवाज इतक्या अभिमानाने घुमल्यामुळे, तिथे उपस्थित असलेल्या आणि थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या परदेशातील मराठी समाजासाठी हा क्षण अत्यंत भावुक आणि अभिमानास्पद ठरला. क्रीडा आणि संस्कृतीचा हा सुंदर संगम एंजेल स्टेडियम मध्ये इतिहास निर्माण करून गेला.

error: Content is protected !!