Buldhana Municipal Council : भाजपचा राजीनामा दिलेले नेते शिंदेंच्या गळाला, शिवसेनेची पालिकेवर निर्विवाद सत्ता

Resigned BJP leaders in Eknath Shinde’s Shivsena : गजेंद्र दांदडे यांची उपनगराध्यक्षपदी, तर देशपांडे, सपकाळ आणि पन्हाड यांची स्वीकृत सदस्यपदी बिनविरोध निवड;

Buldhan बुलढाणा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी गजेंद्र शालिग्राम दांदडे यांची, तर उदय देशपांडे, सुनील सपकाळ आणि मोहन पन्हाड यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. निवड प्रक्रिया शांततेत पार पडली असली, तरी या निर्णयांमागील राजकीय गणिते आणि सत्तासमीकरणांचे संकेत अधिक चर्चेत आले आहेत.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजा संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली. सभेला गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड, मुख्याधिकारी गणेश पांडे, तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांनी शहराच्या विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

सध्याच्या पालिकेतील राजकीय स्थिती पाहता, शिंदेसेना – २२ नगरसेवक, अपक्ष – २, काँग्रेस – २, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – २ असे स्पष्ट

Infrastructure Marvel : भूसंपादन पूर्ण, ५० वर्षांची प्रतीक्षा संपली अकोल्यासह बुलढाणा जिल्ह्यासाठी ‘भाग्यरेषा’!

पालिका निवडणुकीदरम्यान शिंदेसेना आणि भाजप नेत्यांमध्ये तीव्र शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र निवडणुकीनंतर शिंदेसेनेने पालिकेत आपला वरचष्मा प्रस्थापित करत भाजप व इतर पक्षांतील सुमारे २१ माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवले. त्याच टप्प्यावर पालिकेतील सत्तेची दिशा स्पष्ट झाली होती.

ही निवड केवळ पदवाटपापुरती मर्यादित नसून, राजकीय पुनर्संयोजन, निष्ठा बदल आणि आगामी निर्णयांवरील नियंत्रण यांचा ठळक संदेश देणारी ठरली आहे. पुढील काळात स्थायी समित्या, विषय समित्या आणि विकासकामांवरील निर्णयांत हे सत्तासमीकरण कसे प्रभाव टाकते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उपनगराध्यक्षपदापेक्षा अधिक चर्चा स्वीकृत सदस्यांच्या निवडीभोवती केंद्रित झाली आहे. विशेषतः उदय देशपांडे आणि सुनील सपकाळ या नावांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

भाजपचे निष्ठावान मानले जाणारे उदय देशपांडे यांना पालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराजी होती. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत त्यांच्यावर सहा वर्षांच्या पक्षनिष्कासनाची कारवाई जाहीर होण्याआधीच त्यांनी १७ डिसेंबर रोजी भाजपचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अपेक्षेप्रमाणे, शिंदेसेनेने त्यांना स्वीकृत सदस्यपदी संधी दिली.

Khamgao Municipal Council : खामगाव पालिकेत भाजपचा दबदबा; चारही जागांवर भाजपचाच शिक्का

दुसरीकडे, सुनील सपकाळ यांनी काँग्रेसमार्गे उद्धवसेनेत प्रवेश केला होता. पालिका निवडणूक लढवूनही त्यांना पराभव पत्करावा लागला. तरीही शिंदेसेनेने त्यांना स्वीकृत सदस्यपद दिल्याने ‘पराभव नव्हे, उपयुक्तता महत्त्वाची’ असा स्पष्ट राजकीय संदेश दिल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत शिंदेसेनेची रणनिती काय असेल, कोणकोणते चेहरे पुढे आणले जातील, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.