Ruling group swells with 33 of 34 corporators; BJP’s only corporator remains solitary : ३४ पैकी ३३ नगरसेवक सत्ताधारी गटात; भाजपचा एकमेव नगरसेवक एकाकी
Buldhana बुलढाणा नगरपालिकेच्या सत्तेवर आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील गटाने आपली पकड अधिक घट्ट केली आहे. सोमवारी पार पडलेल्या विशेष सभेत नगरपालिकेच्या महत्त्वाच्या विषय समित्या आणि स्थायी समितीचे गठन पूर्ण झाले. नगराध्यक्षा पूजा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सर्व ३३ नगरसेवकांनी एकमताने निर्णयांवर शिक्कामोर्तब केले. मात्र, भाजपचे एकमेव नगरसेवक आकाश दळवी या प्रक्रियेपासून दूर राहिल्याने सभागृहात ‘३३ विरुद्ध १’ असे स्पष्ट राजकीय ध्रुवीकरण पाहायला मिळाले.
महत्त्वाच्या समित्या आणि सभापतींची घोषणा
नगरपालिकेच्या कारभारात कणा मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती आणि इतर विषय समित्यांचे वाटप राजकीय समतोल राखून करण्यात आले आहे.
स्थायी समिती: अध्यक्षपदी पूजा गायकवाड यांची निवड झाली असून, उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे यांच्याकडे नियोजन समितीची धुरा देण्यात आली आहे.
बांधकाम समिती: पुष्पा धूड यांची बांधकाम सभापतीपदी वर्णी लागली आहे.
शिक्षण व आरोग्य: शिक्षण सभापतीपदी दीपक सोनुने तर आरोग्य समितीच्या सभापतीपदी इरशद परवीण मोहम्मद अझहर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा व बालकल्याण: पाणीपुरवठा सभापती म्हणून नयनप्रकाश शर्मा तर महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधू घट्टे यांची निवड झाली आहे. सविता हडाळे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली.
Khamgao Municipal Council : खामगाव नगरपालिकेवर भाजपाचा निर्विवाद ‘दबदबा’
बुलढाणा नगरपालिकेत एकूण ३४ सदस्य आहेत. यामध्ये शिवसेना (गायकवाड गट) २२, काँग्रेस २, राष्ट्रवादी (शरद पवार गट) २, भाजप २, अपक्ष २, ३ स्वीकृत सदस्य आणि १ नगराध्यक्ष यांचा समावेश आहे. यातील ३३ सदस्यांनी सत्ताधारी गटाला पाठिंबा दर्शविला आहे. भाजपचे नगरसेवक आकाश दळवी हे कोणत्याही गटात सामील न होता स्वतंत्र भूमिकेत आहेत. स्थायी समितीच्या निवडीला त्यांची अनुपस्थिती जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
Malkapur Municipal Council : मलकापूर नगर परिषदेत सत्ताधाऱ्यांचा दबदबा कायम
निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील आणि मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. गटनेते मृत्युंजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. नवनियुक्त समितीमुळे पाणीपुरवठा, रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या कामांना गती मिळेल, असा दावा सत्ताधारी गटाकडून करण्यात आला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना समन्वय राखून लोकहिताचा कारभार करण्याचे निर्देश दिले आहेत.








