व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Cataract surgery : समाजकारणातून मिळवले नागरिकांच्या मनात स्थान !

Cataract surgery : समाजकारणातून मिळवले नागरिकांच्या मनात स्थान !

Sudhir Mungantiwar gained a place in the hearts of citizens through social work. : मोतीबिंदूच्या १२ रुग्णांवर नागपूरमध्ये होणार उपचार

Chandrapur : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार हे गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत. या काळात राजकारणापेक्षा समाजकारणातून त्यांनी जनसामान्यांच्या मनात स्थान मिळवले आहे. नागरी सोयी सुविधा पुरवण्यासोबत ते लोकांच्या आरोग्याचीही काळजी घेतात. नुकतेच त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दोन ठिकाणी निःशुल्क मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर घेतले.

आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून दत्त मंदीर देवस्थान, बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे आणि जगन्नाथ बाबा मठात मोदिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले. विसापूर येथील २५ तर नांदगाव पोडे येथील १२ रुग्णांवर नागपूरच्या मेघे हॉस्पीटलमध्ये निःशुल्क शस्त्रक्रिया होणार आहे. रुग्णांना नागपूरला नेणे व परत आणून सोडण्याची जबाबादारीही रुग्णालय व्यवस्थापनाकडून घेण्यात आली आहे.

Urjanagar : मुख्य अभियंत्यांसोबतची चर्चा ऊर्जा नगरच्या विकासात ठरणार मैलाचा दगड !

चंद्रपूरमधील श्री माता कन्यका सेवा संस्थेच्यावतीने नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटरच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरातील तपासणीमध्ये ज्यांना दृष्टीदोष आढळून आला, त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

Sand beach : लाभार्थ्यांचे नुकसान करू नका, आमदार मुनगंटीवार यांच्या सूचना

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आतापर्यंत ३५ हजारांच्या वर नागरिकांना मोफत चष्मे वितरीत करण्यात आले आहेत. १५ हजारांच्या वर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मार्गदर्शन, तपासणी व शस्त्रक्रिया निःशुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी आमदार मुनगंटीवार यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!