Chandrashekhar Bawankule announces that farmers will be provided assistance after conducting panchnamas : महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे सर्वेक्षण करणार
Nagpur पावसाने दडी मारल्याने पिके करपून संकटात सापडलेल्या बळीराजाला राज्य सरकार निश्चितपणे मदत करेल, असा शब्द महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिला.
काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना तात्काळ पाहणी करण्याचे निर्देश दिले असून, ज्या ठिकाणी पावसाअभावी पिके जळाली आहेत तिथे महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे सर्वेक्षण करणार आहेत; हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर नियमानुसार नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
अमरावती येथील दुर्घटनेबाबत बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, १० सदस्यांच्या समितीच्या अहवालानंतर प्राथमिक टप्प्यात निलंबनाची कारवाई झाली असली तरी हे प्रकरण एवढ्यावरच थांबणार नाही. बाल उपचार केंद्रे आधुनिक करण्यासाठी विशेष योजना आखली जात असून, अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी राज्यातील सर्व रुग्णालयांत केली जाईल. उच्च न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांना पोलीस योग्य ते उत्तर देतील असे सांगत, निष्पक्ष चौकशीत दोघांवर गुन्हे दाखल झाले असून दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा सरकार विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तसेच यापुढे सरकारी जमीन कोणाच्याही घशात जाऊ दिली जाणार नाही असा इशाराही दिला. मराठवाड्यात जात प्रमाणपत्र वितरणासाठी शिबिरे आयोजित करणे हे नियमानुसार शासनाचे धोरणच असल्याचे त्यांनी नमूद केले.
Rohit Pawar, Parinay Fuke : रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? भाजप आमदार परिणय फुके यांचा खळबळजनक दावा
शक्तिपीठ महामार्गावरून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गाचे आधी झालेले रस्ते आणि नव्याने माती-मुरमापासून तयार करावे लागणारे रस्ते यातील तांत्रिक फरक रोहित पवारांना समजतो, तरीही ते समाजात नकारात्मकता पसरवत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाचा आणि जनतेचा एकही रुपया वाया जाऊ नये अशा पद्धतीने अत्यंत पारदर्शक इस्टिमेट आणि प्रेझेंटेशन तयार केले असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.








