व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar Bawankule: चव्हाणांनी शिळा भाकरी खाऊ नये, वर्तमानात जगावे: चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक...

Chandrashekhar Bawankule: चव्हाणांनी शिळा भाकरी खाऊ नये, वर्तमानात जगावे: चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला

Chandrashekhar Bawankule Says, Prithviraj Chavan Should Live in the Present : २०१४च्या राजकारणावरून बावनकुळेंचा काँग्रेसला आरसा; राहुल गांधींचा ‘राजकीय बेस’ ढासळल्याचा हल्लाबोल

Nagpur : २०१४ मध्ये शिवसेनेने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी दिलेला महाविकास आघाडीचा प्रस्ताव मीच फेटाळला, या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. चव्हाण यांनी माध्यमांमध्ये अशा ‘पुड्या’ सोडणे थांबवून वर्तमानात जगावे आणि भूतकाळातील घटनांवर आत्मकथा लिहावी, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला.

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, भूतकाळातील घटनांवर आता कोणीही विश्वास ठेवत नाही आणि २०१४ च्या प्रस्तावावर आज बोलणे म्हणजे शिळ्या भाकरी खाण्यासारखे आहे. काँग्रेसने भूतकाळात न अडकता वर्तमान आणि भविष्याची काळजी घेण्याची गरज आहे असा सल्ला बावनकुळे यांनी दिला.

Supriya Sule : ‘पक्ष कोणाचा हे शरद पवार ठरवतील’ सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य

 

 

 

यासोबतच राहुल गांधी यांच्या आंदोलनावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधींचा राजकीय बेस पूर्णपणे ढासळला आहे. त्यांच्या आंदोलनांना ना गर्दी जमतेय, ना मान्यता मिळतेय. त्यामुळे एखादा मुद्दा हातात धरून काहीतरी राजकीय फायदा होईल, या अपेक्षेने त्यांचे राजकारण सुरू आहे.

दरम्यान, ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, एखाद्या वेळी काही तांत्रिक चूक झाली असल्यास ती दुरुस्त केली पाहिजे. परंतु भाजपच्या सभा, विधिमंडळ तसेच राज्य सरकारच्या कार्यक्रमांमध्ये पूर्णपणे वंदे मातरम् गायले जात असून देशाच्या नियमांचे सर्वांनी पालन केलेच पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला असून बावनकुळेंच्या टोलेबाजीने काँग्रेस विरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगला आहे.

error: Content is protected !!