Breaking

Chandrashekhar Bawankule : कोणत्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये, बावनकुळेंनी सुनावले !

 

Chandrashekhar Bawankule said, I don’t know what Manikrao Kokate said; I will see later : कोकाटे काय बोलले, मला माहिती नाही; बोललेही असतील तर मी शेतकऱ्यांची माफी मागतो

Nagpur : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या बाबतीत अपमानजनक वक्तव्य केले. यानंतर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, माणिकराव कोकाटे काय बोलले, मला माहिती नाही. पण ते काही बोललेही असतील, तर मी शेतकऱ्यांची माफी मागतो.

राज्य सरकारमधील कोणत्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळू नये. असे म्हणत मंत्री बावनकुळेंनी अप्रत्यक्षपणे माणिकराव कोकाटेंना सुनावले. आज मी विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने जे नुकसान झाले, त्याबाबत बैठका घेतल्या. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. एकही शेतकरी सुटू नये, अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्वेतून एकही शेतकरी सुटणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे. ज्या-ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. त्यांना नियमाप्रमाणे मोबदला दिला जाईल. यासाठी शेतकऱ्यांना एक डिमांड पाठवावी लागते, त्यावर नियोजन भवनमध्ये बैठकीत चर्चा होईल, असेही ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्र्यांच्या बनावट लेटरहेडवर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले पत्र !

नागपूर जेल शहराबाहेर जाणार..
नागपूर सेंट्रल जेल नागपूर शहराच्या बाहेर नेण्यासाठी जी जागा ठरवायची आहे, त्याचीही बैठक आज असल्याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली. सोबतच नागपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना तयार करायची आहे. त्याचीही एक बैठक आहे. आम्ही या ठिकाणी विदर्भातील सिंचन प्रकल्प, नागपूर महानगरपालिकेच्या सुरेश भट सभागृहासारखे सभागृह लंडन स्ट्रीटवर बांधण्याची योजना तयार केली आहे. त्यावरसुद्धा निर्णय होईल. नागपूरचे गणेशपेठ बस स्थानक आणि मोर भवन बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यासाठीचेही नियोजन करत असल्याचे मंत्री बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : वडेट्टीवार पराभवाच्या मानसिततेतून बाहेर आलेले नाहीत !

नागपुरातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढच्या काळामध्ये नागपूरमधील सर्व सरकारी आणि नजुलज्या जागांवर जे अतिक्रमण केलं गेलं आहे, त्या सर्व जागा रिक्त करण्याची मोहीम हाती घेतो आहोत. त्यासाठी आज योजना तयार करणार असल्याची माहितीही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.