व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण काँग्रेस आऊटडेटेट झालेला पक्ष, कुठल्याही स्थराला जाऊ शकतो, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

काँग्रेस आऊटडेटेट झालेला पक्ष, कुठल्याही स्थराला जाऊ शकतो, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

निवडणुकांमधील पराभवामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत असल्याचा आरोप

Nagpur मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि ‘एसआयआर’ प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादात काँग्रेस व इंडिया’ आघाडीने थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आऊटडेटेट पक्ष झाला आहे. निवडणुकांमधील सातत्यपूर्ण पराभवांमुळे ते आता न्यायव्यवस्थेवर आरोप करायला लागले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

न्यायव्यवस्था ही ‘सेपरेशन ऑफ पॉवर’नुसार स्वतंत्र असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे काम याचिकांवर सुनावणी करण्याचे आहे, कोणाशी चर्चा करण्याचे किंवा निवेदन स्वीकारण्याचे नाही.

अनिल सोले यांच्या बंडखोरीने मुख्यमंत्री अस्वस्थ; पूर्व विदर्भातील आमदारांची आपत्कालीन बैठक बोलावली

सरन्यायाधीशांनी भेटण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात सुरू असलेली शिवीगाळ आणि न्यायालय कमकुवत करण्याचे प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.काँग्रेस पक्ष संविधान हातात घेऊन निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक आणि सीएजी यांसारख्या स्वायत्त व संवैधानिक संस्थांना कुचकामी ठरवण्याचा आणि लोकांमध्ये त्यांच्याविरोधात रोष निर्माण करण्याचा, नॅरेटिव्ह तयार करत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. लोकांना या संस्थांच्या विरोधात चिथावणी देऊन अति डावी सत्ता प्रस्थापित करण्याचा घाट घातला जात असल्याचे ते म्हणाले. १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी संविधानात संशोधन करून मूलभूत अधिकार नाकारले होते आणि न्यायालयाचा मार्ग बंद केला होता, त्याच मार्गावर आज राहुल गांधी चालल्याची टीका त्यांनी केली. तसेच, जंतर-मंतरवरील अराजकतेदरम्यान सोशल मीडियावर पोस्ट बूस्ट करण्यासाठी परदेशी पैसा मिळत असल्याचे संसदीय समितीच्या चौकशीत समोर आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस पक्ष अनेक राज्यांतून पूर्णपणे आऊटडेटेड झाला असून सत्तेत येण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात, परंतु बाबासाहेबांचे संविधान आम्ही कधीही विकृत होऊ देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

 

error: Content is protected !!