व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या अनिल सोले यांच्या बंडखोरीने मुख्यमंत्री अस्वस्थ; पूर्व विदर्भातील आमदारांची आपत्कालीन बैठक बोलावली

अनिल सोले यांच्या बंडखोरीने मुख्यमंत्री अस्वस्थ; पूर्व विदर्भातील आमदारांची आपत्कालीन बैठक बोलावली

भाजपच्याच मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता, नेते लागले कामाला

Nagpur पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर नागपूरच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरुद्ध बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. या बंडखोरीमुळे भाजपच्या गोटात मोठी धाकधूक वाढली असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच पावले उचलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी अडीच वाजता कोराडी येथील नैवद्यम सभागृहात पूर्व विदर्भातील सर्व आमदारांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

अनिल सोले यांच्या बंडखोरीमागे तिकीट वाटपातील मतभेद आणि पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. पूर्व विदर्भातील अनेक भागांत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तळागाळातील हीच नाराजी हेरून सोले यांच्या प्रचाराला मोठा पाठिंबा मिळत आहे. हा पाठिंबा भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी मोठा धोका ठरू शकतो, म्हणूनच पक्षाने याकडे गांभीर्याने पाहिले आहे.

‘वंचित’ला मिळाला कॅप्टन; शिंदेसेनेचा मुहूर्त गुलदस्त्यात!

 

 

आज दुपारी अडीच वाजता नैवद्यम सभागृहात होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीत अनिल सोले यांच्या विरोधात रणनीती आखण्यात येणार आहे. पूर्व विदर्भातील हा गड सुरक्षित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, या बैठकीनंतर नागपूरच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जुन्या जाणत्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अडगळीत टाकले जात असल्याची खंत बंडखोरीनंतर अनिल सोले यांनी व्यक्त केली. त्यांच्यासाठी माजी आमदार व कट्टर स्वयंसेवक गिरीश व्यास यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. सोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर अनेक वर्षांपासून भाजपात कार्यरत असलेल्या व मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनामध्ये असंतोष उफाळून आला आहे.

देवीच्या दरबारात कृष्णाभाऊंचे साकडे!

भाजपच्या विद्यामान आमदारांनाही कोहळे यांची लादलेली उमेदवारी पटलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संदीप जोशी यांच्यासोबत जे घडले त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारत येत नाही. पूर्व विदर्भातील ग्राऊंट रिपोर्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचला आहे.

 

error: Content is protected !!