व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Cm devendra Fadnavis : नागपुरात मुख्यमंत्र्यांचे ‘सस्पेन्स’ अस्त्र; विधान परिषदेसाठी ‘भंडारा पॅटर्न’वर...

Cm devendra Fadnavis : नागपुरात मुख्यमंत्र्यांचे ‘सस्पेन्स’ अस्त्र; विधान परिषदेसाठी ‘भंडारा पॅटर्न’वर नागपूरचे गणित

Devendra Fadnavis refuses to revel suspense of bhandara legislative council: मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली इच्छुकांची भेट, गुपित कायम ठेवले

Nagpur विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नागपूर भाजपमध्ये सध्या प्रचंड रस्सीखेच सुरू झाली आहे. रविवारी नागपूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी अनेक इच्छुकांची भेट घेतली खरी, परंतु नेहमीप्रमाणे आपले गुपित गुलदस्त्यातच ठेवले. अजून ठरायचे आहे, सांगतो… असे आपल्या खास शैलीत उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी इच्छुकांची धाकधूक आणि निवडणुकीतील ‘सस्पेन्स’ आणखीनच वाढवला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ जून जवळ येत असल्याने आता पडद्यामागच्या घडामोडींना कमालीचा वेग आला आहे.

नागपूरच्या या जागेसाठी भाजपमध्ये आता थेट शहर विरुद्ध ग्रामीण अशी अंतर्गत स्पर्धा रंगली आहे. ग्रामीण भागातून माजी जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार, किशोर रेवतकर आणि अविनाश खडात्कर यांनी दिल्ली-मुंबईपर्यंत तगडी फिल्डिंग लावली आहे, तर दुसरीकडे शहरातून माजी महापौर दयाशंकर तिवारी, अविनाश ठाकरे आणि विक्की कुकरेजा यांची नावे आघाडीवर आहेत. दोन्ही गट आपापल्या उमेदवारासाठी पक्षश्रेष्ठींकडे जोर लावत असल्याने कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, नागपूरच्या उमेदवारीचे खरे गणित शेजारच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघाच्या राजकीय समीकरणावर अवलंबून असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Chandrashekhar bawankule: विरोधकांच्या अफवांवर बावनकुळेंचा ‘बाण’; राहुल गांधींना २०४७ चा सणसणीत सल्ला

भंडारा-गोंदियाची जागा महायुतीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने मागितली आहे. भाजपला ही जागा सोडायची नसल्यास, तिथे उमेदवार थेट भाजपचा द्यायचा की राष्ट्रवादीचा उमेदवार कमळ चिन्हावर उभा करायचा, असे नवे समीकरण सध्या बसवले जात आहे. या अंतर्गत जोडण्यांमुळे जर भंडारा-गोंदियामध्ये ओबीसी चेहेरा दिला, तर नागपूरच्या जागेवर ‘ओपन’ उमेदवार दिला जाईल. याउलट तिथे खुल्या प्रवर्गातील उमेदवार आल्यास नागपुरात ओबीसी कार्ड खेळले जाईल, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. दरम्यान, शेजारील वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे अरुण लखानी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे महायुतीला आता केवळ नागपूर आणि भंडारा-गोंदियाचा सोशल इंजिनिअरिंगचा तिढा सोडवायचा आहे.

Legislative election : मुंबईत तटबंदी; विमान थेट मतदानालाच नागपुरात लँड होणार! भाजप नगरसेवकांचा ‘रामभाऊ म्हाळगीत’ राजकीय वर्ग

दुसरीकडे, संख्याबळ कमी असल्याने काँग्रेस छावणीत उमेदवाराबाबत अजूनही पूर्णपणे शुकशुकाट आहे. प्रदेश काँग्रेसने शहराध्यक्षांच्या माध्यमातून इच्छुकांकडून अर्ज मागवले होते, परंतु मुदत संपत आली तरी अद्याप एकानेही अर्ज घेण्याचे धाडस दाखवलेले नाही. शहराध्यक्ष विकास ठाकरे सध्या चाचपणी करत असले, तरी भाजप आणि काँग्रेसच्या मतदारांच्या संख्येत असलेली ‘लक्षणीय तफावत’ पाहता काँग्रेसच्या इच्छुकांनी सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. दरम्यान, संभाव्य घोडेबाजार आणि फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी भाजपने नेहमीप्रमाणे आपली तटबंदी मजबूत केली आहे.

Eknath Shinde Shivsena : अंतर्गत गटबाजीने नुकसान झाले, आता एकनाथ शिंदे लक्ष घालणार!

१५ ते १७ जून दरम्यान मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत भाजप नगरसेवकांसाठी विशेष ‘अभ्यास वर्गा’चे आयोजन करण्यात आले असून सर्व नगरसेवक १४ जूनलाच मुंबईला रवाना होतील आणि थेट १८ जूनला मतदानाच्या दिवशीच नागपुरात दाखल होतील. पुढील आठवड्याच्या शेवटी सर्व उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असले, तरी भाजपची ही अंतर्गत रस्सीखेच राजकारणात कमालीची गाजत आहे.

error: Content is protected !!