व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ‘एसआयटी लावूनच दाखवा, पळता भुई थोडी होईल’; बावनकुळेंना काँग्रेसचे आव्हान!

‘एसआयटी लावूनच दाखवा, पळता भुई थोडी होईल’; बावनकुळेंना काँग्रेसचे आव्हान!

हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांचा पलटवार; श्री शिवाजी शिक्षण संस्थेवरील आरोपांवरून राजकीय संघर्ष तीव्र

Amravati अमरावतीतील श्री शिवाजी शिक्षण संस्थेवर एसआयटी लावण्याच्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘एसआयटी लावूनच दाखवा, तुमची एसआयटी लागली तर पळता भुई थोडी होईल,’ अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांना आव्हान दिले.

काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेतून देण्यात आलेल्या या प्रत्युत्तरामुळे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.

बावनकुळे यांनी अमरावतीतील एका संस्थेवर शिक्षकांवर दबाव आणल्याचा आरोप करत एसआयटी चौकशी करण्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर सपकाळ आणि वडेट्टीवार यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्याचा दाखला देत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. डॉ. पंजाबराव देशमुख आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेल्या या संस्थेने लाखो कुटुंबांना आधार दिल्याचे त्यांनी सांगितले.

संविधानाला धक्का लागल्यास बहुजनांचे हक्क धोक्यात; विजय वडेट्टीवार यांचा इशारा

यावेळी माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनीही एसआयटी चौकशीच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले. चौकशी करायचीच असेल, तर येथील रुग्णालयातील कथित व्हेंटिलेटर घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. या चौकशीतून संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे वास्तव समोर येईल, असा दावाही त्यांनी केला.

error: Content is protected !!