Political equations likely to change after delimitation : अधिकृत घोषणा बाकी, पण बुलढाण्यात ‘नव्या नकाशा’वर राजकीय मोर्चेबांधणी
Buldhana जिल्ह्यात सध्या परिसीमनाचा मुद्दा केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नसून, तो थेट राजकीय रणनीतीचा केंद्रबिंदू ठरताना दिसत आहे. अधिकृत आयोगाची घोषणा अद्याप झालेली नसली तरी विविध पक्षांतील नेते, इच्छुक उमेदवार आणि स्थानिक पदाधिकारी यांनी संभाव्य बदलांच्या अंदाजावर आपापले राजकीय डाव आखण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
कालपर्यंत ज्या भागांशी कोणताही थेट राजकीय संबंध नव्हता, त्या भागांमध्ये अचानक वाढलेली जनसंपर्क मोहीम, बैठका, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि स्थानिक कार्यक्रमांतील उपस्थिती यामुळे या हालचालींना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘रेषा सरकल्या की समीकरणे बदलतात’ या राजकारणातील अटळ सूत्रावर विश्वास ठेवत अनेक नेत्यांनी संभाव्य सीमाबदल लक्षात घेऊन नव्या क्षेत्रात आपली राजकीय चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे.
Yashwant Manohar : आंबेडकर चरित्र-साधने समिती’वरून वादाचे वादळ; समिती बरखास्त करण्याची मागणी
गावोगावी वाढलेली वर्दळ, नव्या चेहऱ्यांची एंट्री आणि जुन्या समीकरणांना नव्या स्वरूपात जुळवून आणण्याचे प्रयत्न यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काही नेते संभाव्य मतदारसंघ बदलांचा अंदाज घेत तालुका आणि विद्यमान मतदारसंघांच्या सीमांपलीकडे सक्रिय झाले आहेत. तर काहींनी नव्या क्षेत्रात स्थानिक कार्यकर्त्यांशी सलोखा वाढवत संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे.
विशेष म्हणजे, ज्या भागात पूर्वी एखाद्या नेत्याची राजकीय ओळख मर्यादित होती, त्या ठिकाणीही सातत्याने हजेरी लावत स्थानिक प्रश्नांमध्ये सहभाग नोंदवून आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामागे आगामी निवडणुकांपूर्वी संभाव्य मतदारसंघ पुनर्रचनेचा लाभ घेण्याची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळे ‘ॲक्शन मोड’वर! ड्रग्ज रॅकेटचा ‘मोठा गेम’ होणार
कोणाचा प्रभावक्षेत्र वाढणार, कोणाची पारंपरिक राजकीय जमीन सरकणार आणि नव्या सीमारेषांमुळे कोणाला राजकीय लाभ होणार, यावरूनच सध्या जिल्ह्यात चर्चा रंगल्या आहेत. परिसीमनाचा अंतिम निर्णय जाहीर होण्यापूर्वीच काही राजकीय समीकरणे आकार घेत असल्याचे संकेत मिळत असून, बुलढाण्यातील आगामी राजकारणासाठी हा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








